आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुजारी बनून दानपेट्या पळवणारा गजाआड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : डोक्याला टिक्का, हातातील थैलीत नारळ, अगरबत्ती, माचिस, हळदी, कुंकू हे ठेवून पुजारी असल्याचे भासवून भजनासह धार्मिक कार्यक्रमांना मंदिरात थांबायचे. रात्रीच्या वेळी कुणीच संधी साधून मंदिरातील दानपेट्या, मुद्देमाल पळवण्याची दिनचर्या करणारा आरोपी एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. बाबासाहेब नारायण वांगे (संजयनगर, जुना जालना) असे आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहरातील रेल्वे स्थानक मार्गावरून तो जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकाच्या मदतीने त्यास अडवले असता, त्याने हातातील थैलीत पूजेचे साहित्य दाखवले. परंतु, गौर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा अट्टल चोरटा आहे, अशी खात्री होती. यामुळे पोलिसांनी त्याच्या कंबर तपासले असता, रॉड दिसून आला. अधिक विचारणा केली असता, कशा प्रकारे पुजारी होऊन दानपेट्या लुटल्या याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय राजेंद्रसिंह गौर, एपीआय दुर्गेश राजपूत, सॅम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, रंजित वैराळ, सचिन चौधरी, विलास चेके, किशोर जाधव यांनी केली आहे.

पब्लिकचा मार खाल्ला तरी सोडली नाही चोरी
मंठा येथे आठ महिन्यापूर्वी मंदिरात चोरी करताना हा आरोपी ग्रामस्थांच्या ताब्यात अडकला होता. याप्रसंगी ग्रामस्थांनी चांगला चोप दिला होता. परंतु, त्या चोरट्याने चोरी करणे सोडले नाही. यानंतरही अंबड रोडवरील साई मंदिरातील दानपेटी फोडली, नाव्हा रोडवरील मंदिरातील पितळी घंटा चोरील, बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील हनुमान मंदिर तसेच इतर ठिकाणे अशा ५ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...