आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गयातील पुजाऱ्यांकडे यजमानांच्या २०० वर्षांपर्यंतच्या पूर्वजांची नाेंदणी, येथे अवघ्या मिनिटभरात मिळते सात पिढ्यांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनिरुद्ध शर्मा  

गया - सध्या गयेमध्ये संपूर्ण भारताचे चित्र बघायला मिळत आहे. राजस्थानचे पगडीवाले, दक्षिणेतील पांढरी लुंगीवाले आणि मराठी टाेपीवाले  सहजपणे आेळखता येऊ शकतात. देशभरातील विविध शहरे आणि गावातून लाेक येेथे येत आहेत. पितृपक्षात येथे जवळपास २ लाख पिंडदान हाेण्याचा अंदाज आहे. मुंबईतील व्यावसायिक कन्हैयालाल तायल आपले वडील व आजाेबांचे पिंडदान करण्यासाठी आले आहेत. येथील पुजाऱ्यांनी आपल्या चाेपडीमध्ये तयाल यांना त्यांच्या आजाेबांची १९७० आणि वडिलांची १९९८ मधील स्वाक्षरी दाखवून आश्चर्यचकित केलेे. गयातल्या पुजाऱ्यांकडे यजमानांची वंशावळच आपल्या चाेपडीमध्ये नाेंद केलेली असते. लाल कपड्यात गुंडाळलेल्या चाेपडीमध्ये तेथे येणाऱ्यांचे नाव, पत्ता आणि येण्याची तारीख नाेंद केली जाते. साेबत आलेल्यांचेही नाव लिहिले जाते. येथील मुख्य विष्णुपद मंदिर व्यवस्थापन समितीचे सचिव गजाधर लाल पाठक म्हणतात की, पुजाऱ्यांकडे यजमानांच्या २०० वर्षे जुन्या म्हणजे जवळपास ६ ते ७ पिढ्यांपर्यंतच्या नाेंदी आहेत. चांद चाैरा, राजेंद्र आश्रम भागात तीन हजार पुजाऱ्यांचे कुटुंब राहतात. वेगवेगळी राज्य व जिल्हे पुजाऱ्यांनी वाटून घेतले आहेत.  येथे आल्यावर काेणी आपल्या जिल्ह्याचे नाव सांगितले व विश्रामगृहात आपला पत्ताही नाेंद केलेला नसेल तरीही जिल्ह्याच्या पुजाऱ्यापर्यंत त्याची माहिती पाेहोचवली जाते. पुजाऱ्यांमधील सक्षम संपर्कामुळे  काही मिनिटांतच संबंधित जिल्ह्याच्या पुजाऱ्याचा संपर्क  करून दिला जाताे. येथील जवळपास ४८० विश्रामगृहापैकी ४०० विश्रामगृह पुजाऱ्यांची आहेत.
 

ठाणे, तालुक्यानुसार ठेवल्या जातात नाेंदी, पूर्वजांच्या स्वाक्षरीचीही हाेते नाेंदणी
पुजाऱ्यांकडील यजमानांची नाेंदणी तालुका आणि शहरांची नाेंदणी ही पाेलिस ठाण्याच्या क्षेत्रानुसार नाेंद आहे. पूर्वी अग्रगण्यानुसार माहितीची नाेंद केली जायची. काही पुजाऱ्यांकडे पाेथ्यांची त्रिस्तरीय व्यवस्था आहे. पहिली पाेथी सूचीची असते, ज्यामध्ये संबंधित जिल्हा व गावाच्या नावाची नाेंद हाेते. यजमानांची नाेंदणी काेणत्या पाेथीत आहे हे या सूचीवरून कळते. दुसऱ्या पाेथीत यजमानांची स्वाक्षरी, कुटुंबाची माहिती, दूरध्वनी क्रमांक नाेंद असताे. तिसऱ्या पाेथीमध्ये कार्यस्थळाची माहिती असते. ही माहिती पिढ्यान‌्पिढ्या अपडेट केली जाते. श्राद्ध, पक्ष संपल्यानंतर या चाेपड्या जतन करण्याचे काम सुरू हाेते.