आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्खननात सापडलेले अवशेष सातवाहन कालखंडातील असल्याचा प्राथमिक अंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला नरखेड येथील उत्खननाद्वारे अनेक रंजक पुरावे प्राप्त होत आहेत. लाल व काळ्या मातीचे भांडे मिळताहेत. शंखाच्या सहाय्याने तयार केलेले दागिने, बांगड्या, मातीच्या रांजणाचे अवशेष, जळालेले ज्वारी - मूग असे तब्बल २०० पेक्षा जास्त वस्तू या उत्खननाद्वारे आतापर्यंत आढळल्या. धान्य साठविण्याची प्राचीन पद्धत पेवही या उत्खननातून उजेडात आले. याबाबतची माहिती पुरातत्त्व तज्ज्ञ तथा पुरातत्त्व शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांनी दिली. 


सोलापूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व शास्त्र विभागातर्फे डॉ. माया पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे उत्खनन मोहीम सुरू आहे. यास तीन आठवडे पूर्ण होत आहेत. या कालावधीत अनेक रंजक वस्तू मिळत आहेत. त्याचे शास्त्रीय वर्गीकरण, विश्लेषण, छायाचित्रण, तसेच मार्किंग व नंबरिंग सुरू आहे. पूर्वी जमिनीच्या खाली खाेलवर उकरून धान्य साठविण्याची जागा तयार केली जात असे. नरखेड येथे मातीच्या कच्च्या विटांच्या व शेणाच्या सहाय्याने धान्य साठविण्याची जागा अर्थात पेव आढळून आले. ताम्रधातूचे जीर्ण नाणेही सापडले. 

 

सातवाहन कालखंड 
इसविसन पूर्व २ शतक ते इसविसन २ शतक असा सुमारे ४०० वर्षांचा कालखंड हा सातवाहन राजाचा कालखंड म्हणून ख्यात आहे. या कालावधीत मानवी संस्कृतीची झलकच नरखेड येथील उत्खननाद्वारे प्रकाशात येत आहे. मातीच्या अनेक वस्तू तर मिळत आहेत, हस्तीदंताचे दागिने, फणीही आढळली. त्यातून सातवाहन कालखंडावर प्रकाश पडतो. उत्खननात आतापर्यंत आढळलेल्या सुमारे २०० वस्तूंचे वर्गीकरण करण्यात येत आहे. - डॉ. माया पाटील, पुरातत्त्व विभागप्रमुख, सोलापूर विद्यापीठ 

बातम्या आणखी आहेत...