आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The Prime Minister Of Ireland Reaches The Village Of His Father In Sindhudurg, Visited The Well Known Temple; Said 'This Is The Most Precious Moment Of My Life'

आयर्लंडचे पंतप्रधान सिंधुदुर्गमध्ये वडिलोपार्जित गावी पोहोचले, कुलदेवतेचे घेतले दर्शन; म्हणाले - 'हा सर्वात अमूल्य क्षण'

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : आयर्लंडचे पंतप्रधान लियो वराडकर रविवारी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपले मूळ गाव वराड येथे पोहोचले. लियो वराडकर यांचे पिता अशोक वराडकर याच गावाचे होते. ते 1960 च्या दशकात यूकेला गेले होते. गावातील लोकांनी वराडकर यांचे भव्य स्वागत केले. यावेळी लियो म्हणाले की, हे त्यांच्या आयुष्यातील खूप विशेष क्षण आहेत. ते आपल्या बहिणी आणि पार्टनरसोबत गावातील कुलदेवतेच्या मंदिरातदेखील गेले. लियो 2017 मध्ये आयर्लंडचे पंतप्रधान बनले होते. 

हा खाजगी दौरा, अधिकृत दौऱ्यादरम्यानही गावी येईन : वराडकर... 


गावात आप्तजनांनी लियो वराडकर यांचे औक्षण केले आणि माथ्यावर टिळा लावून स्वागत केले. त्यांच्या सन्मानार्थ गावामध्ये एक सोहळाही आयोजित केला गेला होता. गावकऱ्यांनी त्यांच्यासोबत फोटो घेतले आणि सेल्फीदेखील घेतल्या. लियो म्हणाले, ''मी येथे माझे आई वडील, बहिणी आणि त्यांच्या पतींसोबत आलो आहे. माझ्या पार्टनरव्यतिरिक्त काही मुलेदेखील आहेत. संपूर्ण कुटुंबासोबत येथे आलो आहे. हे माझ्या आजोबांचे घर आहे. हा माझा खाजगी दौरा आहे. परंतु, जेव्हा अधिकृतरीत्या भारतात पुन्हा आलो तर येथे पुन्हा नक्की येईन.''

लियो भारतीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले पहिले पंतप्रधान आहेत... 


लियो वराडकर यांचा जन्म डबलिनमध्ये झाला होता. त्यांचे शिक्षण डबलिनच्याच ट्रिनिटी कॉलेजमध्ये झाले. 2010 मध्ये त्यांनी मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून करिअरची सुरुवात केली. 2011 मध्ये त्यांनी फाइन गेल पार्टीमधून निवडणूक लढवली आणि जिंकली आणि ट्रान्सपोर्ट, टुरिझम आणि क्रीडा मंत्रालयाचा पदभार सांभाळला. 2017 मध्ये ते पार्टीचे अध्यक्ष बनले आणि निवडणूक जिंकून पंतप्रधान पदाचा स्वीकार केला. लियो भारतीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले पहिले व्यक्ती आहेत, ज्यांना आयर्लंडमध्ये पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली. 40 वर्षांचे लियो आपले पिता अशोक यांचे सर्वात लहान अपत्य आहेत. अशोक 1960 च्या दशकामध्ये इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये काम करत होते. येथेच त्यांची भेट एका नर्ससोबत झाली आणि दोघांनी नंतर लग्न केले. लियोने 2018 मध्ये स्वीकार केले होते की, ते 'गे' आहेत.