आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन हजारांच्या नोटांची छपाई केली कमी: अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्याची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नोटबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या २००० रुपयांच्या नोटांची छपाई कमी करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. वास्तविक छपाई किती कमी करण्यात आली, याची माहिती त्यांनी दिली नाही. 

 

नोव्हेंबर, २०१६ मध्ये त्या वेळी चलनात असलेल्या ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्या नंतर चलनाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी दोन हजारांच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. नंतर ५०० रुपये, २०० रुपये आणि १०० रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या, त्याच वेळी २००० हजारांच्या नोटांची छपाई कमी करण्यात येईल, असा निर्णय झाला होता.