आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - २०१७ वर्षात देशभरात सुमारे ५००२ कोटी रुपयांची संपत्ती चोरीस गेली. म्हणजे दिवसाला सरासरी १४ कोटी रुपयांच्या संपत्तीची चोरी झाली, ही माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्डच्या(एनआरबी) अहवालात देण्यात आली आहे. चोरीस गेलेली संपत्ती परत मिळण्याची आकडेवारी खूप निराशाजनक आहे. कारण चोरीस गेलेली २६ टक्के संपत्ती पुन्हा हाती लागली आहे. चाेरीस गेलेले लॅपटॉप-मोबाइल यासारखे गॅजेट्स सापडण्याचे प्रमाण १८ टक्के तर गाई-म्हशी सापडण्याचे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. अहवालानुसार, राजधानी दिल्ली प्रदूषण व खराब पाण्याबरोबरच चोरीच्या घटनांतही अव्वल स्थानावर आहे. दिल्लीत २०१७ मध्ये १.६१ लाखांहून अधिक प्रकरणे घडली ही प्रकरणे ७०% इतकी होती. त्याखालोखाल बंगळुरू (१०८०४ प्रकरणे) व ९७१८ प्रकरणे मुंबईची आहेत.
चोरीस गेलेली ७४% संपत्ती हस्तगत होऊ शकली नाही
सर्वात रंजक आकडेवारी हस्तगत करण्यात आलेल्या संपत्तीबाबत आहे. २०१७ मध्ये सुमारे ५००२ कोटी रुपयांची संपत्ती चोरीस गेली. यातील २६ टक्के संपत्ती हस्तगत करण्यात यश मिळाले. म्हणजे चाेरीस गेलेल्या ७४ टक्के संपत्तीचा ठावठिकाणा लागला नाही. धक्कादायक बाब म्हणजे मोबाइल व लॅपटॉपपेक्षा जास्त मुद्देमाल गाय-म्हैस अथवा अन्य प्राणी मिळवण्यात यश मिळाले आहे. संपत्तीमध्ये सर्वाधिक यश हिसकावणे (९१%) व दुर्मिळ वस्तू (७३%) हस्तगत करण्यात आले
७.३९ लाखांहून अधिक प्रकरणांची गेल्या वर्षी नोंद
अहवालानुसार, २०१७ मध्ये संपत्ती चाेरीची ७.३९ लाखांहून जास्त प्रकरणे नाेंदली गेली. दरम्यान, चोरीस गेलेल्या संपत्तीची किंमत ५००२ कोटी रुपये इतकी आहे. म्हणजे दररोज सरासरी १४ कोटी रुपयांची संपत्ती चोरीस जात हाेती. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे वाहन चोरीची आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दागिन्यांच्या चोरीची आहेत. संपत्तीबाबतचे ७.७५ लाखांहून अधिक गुुन्हे नोंदले गेले. देशात नोंदल्या गेलेल्या एकूण गुन्ह्यात हे प्रमाण २५.३% इतके आहे. यात ६.९९ लाखांहून अधिक गुन्हे चोरी, घरफोडीचे आहेत.
मोबाइल चोरी प्रकरणे : 1.04 लाख, किंमत -118 कोटी पैकी हस्तगत 18 टक्के
26% संपत्ती हस्तगत करण्यात यश
पशू चोरी प्रकरणे : 7.5 हजार, किंमत 43 कोटी रु.
हस्तगत 32 टक्के
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.