आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत लालबाग राजासह विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीला चौपटीवर भावपूर्ण निरोप देण्यात आला. 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव चौपटीवर विसर्जन करण्यात आले. विसर्जनापूर्वी शहरातीविविध भागांतून गणेश मंडळांची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत भाविक भक्तांची मोठी गर्दी जमली होती. खेतवाडी, चंदीवाडीसह विविध मिरवणुकीत विविध रुपातील गणेशाची मूर्तींनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. या मिरवणुकीमध्ये हनुमान, कालियामर्दन, महादेव आदींच्या रूपातील मूर्ती पाहण्यास मिळाल्या.  


अनंत चतुर्दशी निमित्त काल मुंबईतही गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. गुरुवारी सकाळपासूनच सार्वजनिक आणि घरातील गणपती विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली. या वर्षी मुंबईत 7 हजार 703 सार्वजनिक गणपती मंडळांची स्थापना झाली होती. मुंबईत गुरुवारी सुरू झालेल्या विसर्जनाची प्रक्रिया शुक्रवारी सकाळपर्यंत सुरूच होती. रस्त्यावर विविध ठिकाणी जॅम टाळण्यासाठी ट्रॅफिक वळवण्यात आले होते. मुंबईत गुरुवारी गणपती मंडळांच्या सदस्यांना ब्रिजवरून बाप्पांना वाहनात घेऊन जाऊ नये असे आवाहन करण्यात आले होते. .