आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Proposal For Withdrawal Of Bharat Ratna Has Already Been Proposed Alka Lamba

भारतरत्न परत घेण्याचा प्रस्ताव आधीच मांडला; राजीव गांधींविरोधी प्रस्तावावर अलका लांबांचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली विधानसभेत शुक्रवारी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा भारतरत्न सन्मान परत घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावरून सत्ताधारी आम आदमी पार्टीला (आप)  अंतर्गत तसेच बाहेरदेखील घेरण्यात आले. 

 

पक्ष व सरकारकडून या प्रस्तावासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. या प्रस्तावात राजीव गांधी यांचा सन्मान परत घेण्याचा मुद्दा आधीच दडवण्यात आला होता, असा दावा बंडखोर भूमिका घेणाऱ्या आप आमदार अलका लांबा यांनी केला आहे. दुसरीकडे विधानसभेचे सभापती राम निवास गोयल यांनी मूळ प्रस्तावात राजीव गाांधी यांचा उल्लेख नव्हता, असा दावा केला आहे. मात्र, आमदार जरनैल सिंह यांनी भावनावेशात तो हातून मांडला होता. दुसरीकडे विधानसभेच्या कामकाजाच्या फुटेजमध्ये प्रस्ताव पारित होऊन स्वीकारल्याचे दिसते. 

 

मुख्यमंत्री केजरीवाल यांचा प्रश्नांना बगल देत पळ 
या प्रश्नावर सत्ताधारी आप सरकारचे मंत्री तसेच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्पष्टपणे भूमिका घेण्याचे टाळले आहे. शनिवारी सकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी प्रसार माध्यमांनी या प्रस्तावावर सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. 

 

सरकारचे अनेक दावे आणि व्हिडिओ जाहीर झाला 
विधानसभेतील मांडलेला प्रस्ताव दाखवणारा व्हिडिओ माध्यमातून जाहीर झाला आहे. त्यानुसार सदनात झालेल्या वाचनातही राजीव गांधी यांचा नामोल्लेख होता. दुसरीकडे अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सभागृहात पारित झाला नसल्याचे विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...