आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रूजेटचे हैदराबाद-शिर्डी प्रस्तावित विमान तूर्त रद्द : 20-25% प्रवासी घटण्याची होती भीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - २०१५ मध्ये औरंगाबाद- हैदराबाद- तिरुपती ही सेवा सुरू केली. सेवा सुरू करतानाच ट्रूजेटने त्यांचे लक्ष्य तिरुपती- शिर्डी असे असल्याचे सांगितले हाेते. पूर्वी शिर्डीला विमानतळ नसल्याने प्रवासी औरंगाबादला उतरत होते. येथून त्यांना शिर्डीला जावे लागत. यात प्रवाशांचा बराच वेळ जातो. शिर्डी विमानतळ सुरू झाल्याने ट्रूजेटने थेट हैदराबाद-शिर्डी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

 

हैदराबादहून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांमध्ये बहुतांश शिर्डीला जाणारे असतात. हैदराबाद-शिर्डी विमानसेवा सुरू झाल्यास हा प्रवासी घटण्याची शक्यता आहे. भविष्यात यामुळे हैदराबाद-औरंगाबाद विमान कायमचे बंद होण्याचा धोका आहे. मात्र, औरंगाबाद विमानतळावरील ट्रूजेटच्या स्टेशन मॅनेजर प्रतिमा थोटे यांनी हा धोका नाकारला आहे. त्यांच्या मते हैदराबादहून येणारे केवळ २० ते २५ टक्के प्रवासीच शिर्डीला जातात. उर्वरित पर्यटक, व्यावसायिक असतात. त्यामुळे औरंगाबादचे विमान बंद होणार नाही, असा दावा थोटे यांनी केला आहे. 


२८ ऑक्टोबरपासून होणार होते सुरू नोव्हेंबरनंतरच सुरू होऊ शकते नवे विमान 
हैदराबाद -शिर्डीसाठी दुसरे विमान सुरू आता नोव्हेंबरनंतरच विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो, असे नमूद करण्यात आले आहे. ट्रूजेटचे विमान रद्द झाले असले तरी गेल्यावर्षी १ ऑक्टोबरपासून एअर इंडियाची उपकंपनी अलायन्स एअरलाइन्सची हैदराबाद -शिर्डी सेवा सुरू आहे. 

 

सेवा सुरू होण्यास तीन दिवस असताना केले रद्द 
ट्रूजेटने महिनाभरापूर्वी हैदराबादहून शिर्डीसाठी २८ ऑक्टोबरपासून नवीन विमानाची घोषणा केली होती. हे विमान दुपारी १२ वाजता हैदराबादहून उड्डाण करणार होते, तर शिर्डीहून २.१० वाजता परतीच्या प्रवासाला निघणार होते. यासाठी किमान २५०० रुपये भाडे होते. या विमानाची तयारी सुरू झाली असताना गुरुवारी संध्याकाळी हे विमान रद्द करण्यात आल्याचा मेल ट्रूजेटच्या औरंगाबाद कार्यालयाला मिळाला.

बातम्या आणखी आहेत...