आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोंदिया - राज्यव्यापी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाजनादेश यात्रेचा रथ गोंदियामधील नेहरू चौकात “सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’च्या आंदोलकांनी अडवला. आरक्षण हटवण्याची मागणी त्यांनी केली. अखेरीस पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यावर रथ पुढे गेला.
आपण सर्व समाजासाठी काम करीत असून खुल्या वर्गातील गरीब विद्यार्थ्यांसाठी ६०५ अभ्यासक्रमांचे शुल्क भरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपण वंचित, आरक्षित, खुल्या अशा सर्व समाजाच्या विकासासाठी बांधील असल्याचे आश्वासनही त्यांनी आंदोलकांना दिले. रात्री नऊच्या सुमारास फडणवीस यांचा रथ येथील इंदिरा गांधी स्टेडियममधील जाहीर सभेसाठी जात असताना पन्नासेक विद्यार्थी आणि पालकांंनी रथाला घेरले. “सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ नावाचे फलक घेतलेले आणि बॅनर घातलेले विद्यार्थी आणि पालक शिट्या वाजवत आक्रमक झाले होते. त्यांना पोलिसांनी आवरले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.