आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ गेटवर आज आठवले, कवाडे, आनंदराज, हंडोरे यांच्या जाहीर सभा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सोमवारी विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या नेत्यांच्या जाहीर सभांचे होणार आहेत. 

 

रिपाइंचे (ए) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा संध्याकाळी सात वाजता डॉ. आंबेडकर वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत नामांतर शहीद अभिवादन सभा' होणार आहे. दादाराव राऊत अध्यक्षस्थानी राहतील. विद्यापीठ गेटजवळील मैदानावर संध्याकाळी ६ ते १० या वेळेत होणाऱ्या सभेला राष्ट्रीय प्रवक्ते अॅड. संघराज रूपवते, राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बौद्धनकर, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष विवेक बनसोडे, विजय वाकोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भीमशक्तीचे सर्वेसर्वा चंद्रकांत हंडोरे यांची सभा मिलिंद वसतिगृहाच्या शेजारी होणार आहे. दिवसभर भोजनदान आणि संध्याकाळी सात वाजता आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार राहणार आहेत. डॉ. कल्याण काळे, आमदार सुभाष झांबड, दिनकर ओंकार, राजू वाघमारे, नामदेव पवार, संतोष भिंगारे आदींची उपस्थिती राहणार आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष-यूथ रिपब्लिकनचे नेते मनोज संसारे यांची सभा पीईएसच्या निवासस्थानाच्या परिसरात होईल. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तथा आमदार जोगेंद्र कवाडे यांची सभा डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर होईल. 

 

पोलिसांचा कडक बंदोबस्त 
मागील वर्षी आठवले यांच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्य राखीव पोलिस दल आणि स्ट्रायकिंग फोर्ससुद्धा तैनात करण्यात आले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...