आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- येत्या 16 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्री कारभार पाहाणार आहेत. परंतु यापूर्वी 1978 मध्ये शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून स्थापन केलेल्या पुलोद सरकारमध्ये मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासह केवळ पाच मंत्र्यांनी शपथ घेतली होती, अशी माहिती विधिमंडळ अधिवेशनाचा धांडोळा घेतला असता समोर आली.
1978 मध्ये अधिवेशन सुरू असताना शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडल्याने त्यांच्या सरकारने अधिवेशन सुरू असताना 17 जुलै रोजी राजीनामा दिला होता. त्या नंतर 18 जुलैला पुलोद सरकारचा शपथविधी होऊन 20 जुलैला अधिवेशन सुरू झाले. त्यावेळी 20 ते 29 जुलैपर्यंत अधिवेशन चालले. त्यात पाच मंत्री व शरद पवार मुख्यमंत्री हाेते, अशी माहिती ग्रंथालय प्रमुख बा. बा. वाघमारे यांनी दिली.
या विधिमंडळात 97 सदस्य नवीन आहेत. यामध्ये 24 महिला सदस्य असून त्यांना या निमित्ताने बोलण्याची संधी आहे. विधिमंडळ ग्रंथालयात पहिल्या अधिवेशनापासूनची संपूर्ण माहिती वादविवाद, चर्चा उपलब्ध आहे. नवीन सदस्य संदर्भासाठी ग्रंथालयाचा उपयोग करू शकतात. नागपूरसह विदर्भातील संशोधक तसेच अभ्यासकांनी वाचनालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन बा. बा. वाघमारे यांनी केले आहे. या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नसल्याने पुरवणी मागण्या, अल्पकालीन चर्चा, 289 चा प्रस्ताव, राज्यपालांचे अभिभाषण यावर नवीन सदस्यांना बोलण्याची संधी आहे.
या अधिवेशनात 24 महिला आमदार आहे. यामध्ये भाजपाच्या सर्वाधिक 12, काँग्रेस 05, राष्ट्रवादी 03, शिवसेना 02 व अपक्ष 02 अशी संख्या आहे. या 24 मध्ये सुलभा संजय खोडके, प्रतिभा सुरेश धानोरकर, श्वेता विद्याधर महाले आणि अॅड. यशोमती ठाकूर या तीन विदर्भातील आहेत. यापूर्वी 1937 ते 39 मध्ये 07, 1946 ते 62 मध्ये 09, 1978 ते 80 मध्ये 08 इतक्या कमी महिला आमदार होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.