आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोहा : डेझर्ट रोझद्वारे प्रेरित कतार म्युझियम उद्यापासून सुरू होणार, २९९५ कोटींचा खर्च, ७६ हजार पॅनलद्वारे त्याचे छत बनवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोहा (कतार)  - कतारचे डेझर्ट रोझ म्युझियम गुरुवारी सामान्य जनतेसाठी खुले होईल. त्याच्या एक दिवस आधी बुधवारी त्याचे उद्घाटन होईल. पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे प्रमुख केंद्र असेल. विमानतळापासून काही अंतरावरच ते तयार करण्यात आले आहे. वाळवंटी गुलाबाच्या आकृतीचे हे म्युझियम तयार करण्यासाठी सुमारे १० वर्षे लागली. ते ७ वर्षांतच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.  त्यावर २९९५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

 

म्युझियमचे संचालक जासीम अल-थानी म्हणाले की, डेझर्ट रोझ म्युझियम कतारच्या लोकांची कथा सांगते.  
कतारची सर्वात जुने कुराण आणि मोत्यांचा गालिचाही : म्यूजियमच्या आत १५०० मीटरची गॅलरी  आहे. २२० आसनी ऑडिटोरियम, दोन रेस्तराँ, १ कॅफेही बनवला आहे. त्याशिवाय ८ हजार चौरस मीटरची स्थायी प्रदर्शन जागाही आहे. २००० चौ. मी. ची रोटेटिंग स्पेसही ठेवली आहे. म्युझियमच्या संचालकांनुसार, म्युझियमचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे १९ व्या शतकातील गालिचा, त्यावर १५ लाख दुर्मिळ मोती जडवलेले आहेत. ते अरबस्तानातच मिळतात. कतारचे सर्वात जुने कुराणही येथे पर्यटकांना पाहायला मिळेल. दोहा (कतार) 
कतारचे डेझर्ट रोझ म्युझियम गुरुवारी सामान्य जनतेसाठी खुले होईल. त्याच्या एक दिवस आधी बुधवारी त्याचे उद्घाटन होईल. पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे प्रमुख केंद्र असेल. विमानतळापासून काही अंतरावरच ते तयार करण्यात आले आहे. वाळवंटी गुलाबाच्या आकृतीचे हे म्युझियम तयार करण्यासाठी सुमारे १० वर्षे लागली. ते ७ वर्षांतच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.  त्यावर २९९५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. म्युझियमचे संचालक जासीम अल-थानी म्हणाले की, डेझर्ट रोझ म्युझियम कतारच्या लोकांची कथा सांगते.  

 

कतारची सर्वात जुने कुराण आणि मोत्यांचा गालिचाही : म्यूजियमच्या आत १५०० मीटरची गॅलरी  आहे. २२० आसनी ऑडिटोरियम, दोन रेस्तराँ, १ कॅफेही बनवला आहे. त्याशिवाय ८ हजार चौरस मीटरची स्थायी प्रदर्शन जागाही आहे. २००० चौ. मी. ची रोटेटिंग स्पेसही ठेवली आहे. म्युझियमच्या संचालकांनुसार, म्युझियमचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे १९ व्या शतकातील गालिचा, त्यावर १५ लाख दुर्मिळ मोती जडवलेले आहेत. ते अरबस्तानातच मिळतात. कतारचे सर्वात जुने कुराणही येथे पर्यटकांना पाहायला मिळेल. 

 

प्रवेशद्वारीच ११४ कारंज्यानी स्वागत

५२००० चौ. मी. तील हे म्युझियम दोहाच्या वॉटरफ्रंट कॉरनिक येथे आहे. विमानतळावरून सिटी सेंटरच्या रस्त्यात त्याची पहिली झलक दाखवणारी इमारत आहे.  डेझर्ट रोज नॅशनल म्युझियममध्ये प्रवेश करतात ९०० चौ. मी. च्या भागात ११४ कारंजे आहेत. त्याच्या घुमटाकृती छतात ३६०० वेगवेगळ्या आकृत्यांट्ा आकाराच्या ७६,००० पट्ट्या लावल्या आहेत. त्याचे डिझाइन फ्रेंच आर्किटेक्ट जीन नोव्हेलने तयार केले आहे. त्यानेच  चर्चित लोवर अबुधाबीचे डिझाइनही तयार केले होते. 

 

११ गॅलऱ्यांत इतिहास
म्युझियममध्ये १.५ किमीतील ११ गॅलऱ्यांत ३ चॅप्टरद्वारे कतारचा इतिहास दाखवण्यात आला आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...