आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन दुकानदारांचे प्रश्न राहिले बाजूला, मोदींचे भाऊ-आमदार सत्तारांत खडाजंगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रेशन दुकानदारांच्या मोर्चात मोदी सरकारवर तोंडसुख घेणाऱ्या काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ आणि रेशन दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी चांगलेच फटकारले. मोर्चाच्या आडून राजकीय खिचडी पकवू नका, अशा कानपिचक्या देऊन डीबीटीची योजना यूपीए सरकारच्या काळातली आहे. आपण मंत्रिपद भूषवले आहे. आपल्याला कोणतेही राजकीय व्यासपीठ मिळाले नाही म्हणून इथे अालात का? किमान व्यासपीठाचा विचार करा आणि भावा-भावांमध्ये भांडण लावून परिवारात दरार निर्माण करू नका, अशा शब्दात प्रल्हाद मोदींनी सत्तार यांना फटकारले. प्रल्हाद मोदींच्या प्रत्युत्तराने सत्तार यांनी तीन मिनिटांत व्यासपीठ सोडले. दोघांच्या या वादात मोर्चेकऱ्यांचे प्रश्न मात्र बाजूलाच राहिले. 


स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे मंगळवारी डीबीटी विरोधासह विविध मागण्यांसाठी क्रांती चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. उर्वरित. पान ६ 
रेशन दुकानदार म्हणाले, डीबीटी रद्द करा, अन्यथा भाजप सरकारला धडा शिकवू 
डीबीटी बंद करा, या मागणीसाठी राज्य रेशन दुकानदार संघटनेने मंगळवारी शहरातून मोर्चा काढला. 


डीबीटी म्हणजे काय ? : 'डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर' अर्थात डीबीटी म्हणजे थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणारे रोख अनुदान. गहू दोन रुपये किलोप्रमाणे मिळणार असेल तर सरकार ज्या दराने खरेदी करते त्या दरामधली तफावत लाभार्थीच्या खात्यात जमा होणार आहे. धान्य अथवा पैसे हे दोन्ही पर्याय लाभार्थींसाठी उपलब्ध आहेत. प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आलेल्या शासनाच्या या निर्णयाला रेशन दुकानदार संघटनेचा विरोध आहे. यामुळे अस्तित्वालाच धोका असल्याचे स्वस्त धान्य दुकानदारांचे म्हणणे आहे. 


रेशन दुकानदारांना पगार द्या 
मी स्वत: रेशन दुकानदार आहे. डीबीटी म्हणजे दुकानदारांचा मृत्युदंड ठरणार आहे. आम्हाला पगार द्या ही समस्या सुटेल, सरकारने हा विचार करावा. पुढील वर्षी सन २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. डीबीटीमुळे देशात कुपोषणाची समस्या वाढेल. जुगार खेळण्यासाठी महिलांकडून पैसे मागितले जातील. मग त्यांच्यावर अत्याचार होतील. डीबीटीमुळे दुसरीच समस्या निर्माण होईल. सरकार नक्की विचार करेल. त्यामुळे महाराष्ट्राचे अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापटांनी हे लक्षात घ्यावे, असे प्रल्हाद मोदी म्हणाले. 
  

बातम्या आणखी आहेत...