Home | Sports | From The Field | The Rajasthan Royals hope to have a play-off entrance

राजस्थान संघाच्या प्ले ऑफ प्रवेशाच्या आशा कायम; वाॅर्नरच्या सलग तिसऱ्यांदा ६०० धावा

वृत्तसंस्था | Update - Apr 28, 2019, 10:11 AM IST

स्मिथच्या नेतृत्वात राजस्थान राॅयल्स संघाची अव्वल खेळी

  • The Rajasthan Royals hope to have a play-off entrance

    जयपूर - संजू सॅमसन (नाबाद ४८) अाणि लाइमच्या (४४) शानदार खेळीच्या बळावर यजमान राजस्थान राॅयल्स संघाने शनिवारी अायपीएलमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. राजस्थान संघाने अापल्या घरच्या मैदानावर पाहुण्या सनरायझर्स हैदराबाद संघावर ७ गड्यांनी मात केली. यासह राजस्थान संघाने यंदाच्या लीगमध्ये पाचव्या विजयाची नाेेंद केली. यासह राजस्थानने प्ले अाॅफ प्रवेशाच्या अाशा कायम ठेवल्या.
    प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने ८ बाद १६० धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने तीन गड्यांच्या माेबदल्यात १९.१ षटकांत सामना जिंकला. या विजयाच्या बळावर राजस्थान संघाने गुणतालिकेत सहाव्या स्थानावर धडक मारली. संघाच्या विजयात स्मिथने २२, रहाणेने ३९ धावांचे याेगदान दिले.


    तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबाद संघाचा युवा फलंदाज मनीष पांडे सामन्यात चमकला. त्याने यजमान राजस्थान राॅयल्स संघाविरुद्ध शानदार अर्धशतक ठाेकले. त्याने ३६ चेंडूंमध्ये झंझावाती ६१ धावा काढल्या. यात ९ चाैकारांचा समावेश अाहे. यासह त्याने अापल्या अायपीएल करिअरमधील १३ वे अर्धशतक साजरे केले. याशिवाय त्याने डेव्हिड वाॅर्नरसाेबत दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. डेव्हिड वाॅर्नरने ३७ धावांचे याेगदान दिले. यासह त्याने तिसऱ्यांदा ६०० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत.

Trending