आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Rape Victim Who Burnt Herself In Front Of The Police Superintendent's Office In Unnao Died During Treatment

उन्नावमध्ये पोलिस अधीक्षकाच्या ऑफिससमोर स्वतःला जाळून घेतलेल्या बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरुणीने 16 डिसेंबरला उन्नाव एसपी कार्यालयाबाहेर स्वतवर केरोसिन टाकून आग लावली होती

कानपूर- उन्नावमधील पोलिस अधीक्षक(एसपी) कार्यालयाबाहेर स्वतःला आग लावून घेतलेल्या बलात्कार पीडित तरुणीचा शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 23 वर्षीय तरुणीने आरोप लावला होता की, आरोपी अवधेश सिंहविरोधात पोलिस तक्रार देऊनही कारवाई करत नाहीये. तिने दावा केला होता की, आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते, पण नंतर त्याने नकार दिला.अवधेश सिंहविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली होती, पण न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. तरुणी 70 टक्के भाजली होती आणि ते कानपूरमधील लाला लाजपत राय हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. डॉक्टरांनी सांगितले की, तरुणीच्या पोट आणि श्वसन नलिकेत सूज आली होती आणि त्यामुळेच सकाळपासून तिला वेंटिलेटरवर ठेवले होते.


उन्नावचे पोलिस अधीक्षक विक्रांत वीर यांनी सांगितल्यानुसार, तरुणीचे अवधेशसोबत अनेक वर्षांपासून प्रेम संबंध होते. महिलेने दोन ऑक्टोबरला अवधेशवर लैंगिक शोषणाचे आरोप लावून तक्रार दाखल केली होती. सध्या पोलिस पुढील तपास करत आहेत.