आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

39 लाख हेक्टर क्षेत्राचा पीक विमा, पंचनामे सुरू, भरपाई किती मिळणार हाच खरा प्रश्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ३९ लाख हेक्टरवरील पिकांना शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे संरक्षण दिले आहे. त्यासाठी ३३८ कोटी रुपयांची रक्कमही हप्ता म्हणून भरली आहे. यातून शेतकऱ्यांना १४ हजार ४७७ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र गत वर्षांचे अनुभव लक्षात घेता यातील किती रक्कम शेतकऱ्यांच्या हाती पडेल, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम प्रगतिपथावर असून सोमवारी दुपारपर्यंत २९. ९२ टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले होते. या आठवड्याच्या शेवटी हे काम पूर्ण होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.


औरंगाबाद जिल्ह्यातील १० लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी ४ लाख ७२ हजार हेक्टरवर पेरणी केलेल्या पिकांसाठी ५० कोटी २३ लाख रुपये विमा कंपनीकडे भरले आहेत. १५६२ कोटी ८० लाख रुपयांचा त्यातून विमा काढण्यात आला आहे. जालन्यातील १० लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी ४ लाख ५ हजार हेक्टरवरील पिकांसाठी ३१ कोटी ७० लाख विमा कंपन्यांकडे भरले आहेत. त्यातून १२११ कोटी ४३ लाखांचा विमा काढण्यात आला आहे. बीडमध्ये २० लाख ९३ हजार शेतकऱ्यांनी ७ लाख ४३ हेक्टरवरील पिकांसाठी ७२ कोटी ६७ लाख रुपये भरले. कंपन्यांनी २७५४ कोटी ३२ लाखांचा विमा त्यातून काढला. लातूर जिल्ह्यातील १० लाख ८२ हजार शेतकºयांनी ५ लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांपोटी ४६ कोटी १ लाख रुपये विमा कंपन्यांकडे भरले. कंपन्यांनी २२५६ कोटी ५३ लाख रुपयांचा विमा यातून काढला.


उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख ६२ हजार हेक्टरवरील पिकांसाठी ४१ कोटी ८० लाख रुपये विमा कंपन्यांकडे अदा केले. कंपन्यांनी २ हजार ३९ कोटींचा विमा त्यातून काढला. नांदेड जिल्ह्यातील ११ लाख ९२ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख ७९ हजार हेक्टरवरील पिकांसाठी ४८ कोटी ९९ लाख रुपये कंपन्यांकडे भरले. कंपन्यांनी २२०७ कोटी ६२ लाख रुपयांचा विमा काढला. परभणी जिल्ह्यात ८ लाख २१ हजार शेतकऱ्यांनी ४ लाख २९ हजार हेक्टरवरील पिकांसाठी ३४ कोटी ३१ लाख रुपये विमा कंपन्यांकडे भरले. कंपन्यांनी १५१२ कोटी ७१ लाख रुपयांचा विमा त्यातून काढला. हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ३९ हजार शेतकऱ्यांनी १ लाख ५१ हजार हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांसाठी १२ कोटी ७५ लाख रुपये विमा कंपन्यांकडे भरले. कंपन्यांनी १२३३ कोटी ५१ लाख रुपयांचा विमा त्यातून काढला.

शेतकरी रस्त्यावर
काही ठिकाणी पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जेवढ्या रकमेचा विमान काढला, तेवढी रक्कम त्यांना मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र गत दोन वर्षांत विमा कंपन्यांनी तसे होऊ दिले नाही. जेवढे हफ्ते भरले तेवढीही रक्कम शेतकऱ्यांच्या हाती पडली नव्हती. त्यामुळे आता काय होते, हा प्रश्न आहे. अर्थात यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरतील, अशी चिन्हे आहेत. कारण आता शेतकऱ्यांच्या हाती काहीही उरलेले नाही.
 
पिंपळगाव पेठ (ता. सिल्लोड)येथील खेमचंद फुले यांच्या शेतातील मक्याला असे काेंब फुटले.
 

बातम्या आणखी आहेत...