आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9/11 Attacks: का केला लादेनने अमेरिकेवर हल्ला? येथे जाणून घ्या हल्ल्यापूर्वीची Timeline

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - एकेकाळी जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनने केलेला 9/11 घात अमेरिका आजही विसरलेला नाही. 2001 मध्ये याच तारखेला अल-कायदाने अमेरिकेवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्याची पार्श्वभूमी मांडणाऱ्या एका माहितीपटात काही दावे करण्यात आले आहेत. त्यानुसार, लादेन आपले कुटुंब मोडल्यावरून खूप दुखी होता. त्याच्या खासगी आयुष्यात अमेरिकेने खूप त्रास दिला होता. आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटासाठी तो अमेरिकेला जबाबदार धरत होता. याचाच बदला घेण्यासाठी त्याने अमेरिकेवर हल्ला केला होता असा खुलासा करण्यात आला आहे.


अमेरिकेमुळेच झाले होते हाल
> हिस्ट्री चॅनलची डॉक्युमेंट्री 'रोड टू 9/11' नुसार, ओसामाने खासगी आणि कौटुंबिक कारणांमुळे अमेरिकेवर हल्ला केला होता. डॉक्युमेंट्रीच्या तीन भागांत दाखवल्याप्रमाणे, तो जवळपास हल्ल्याच्या 10 वर्षांपूर्वी एका पाठोपाठ एक घटना घडण्यास सुरुवात झाली होती. 
> 90 च्या दशकात ओसामाब आपल्या कुटुंबियांसोबत सुदान येथे मस्त आयुष्य जगत होता. त्याचवेळी अमेरिकेने सुदान सरकारवर लादेनला देशाबाहेर काढण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. दबाव इतका वाढला की लादेनला सुदान सोडावे लागले. 
> त्यावेळी लादेनकडे राहण्यासाठी ठिकाणच उरले नव्हते. नाइलाज म्हणून तो आपले कुटुंब घेऊन अफगाणिस्तानात गेला. मात्र, त्यावेळी त्याची अवस्था प्रत्येक बाबतीत खूप वाइट होती. तर, अफगाणिस्तानची परिस्थिती सुद्धा काही चांगली नव्हती.


परिस्थितीमुळेच द्यावा लागला घटस्फोट
> अफगानिस्तान गेल्या दशकभरापासून सोव्हिएत संघ विरुद्ध (आताचा रशिया) युद्धाला सामोरे जात होता. त्यामुळे, अफगाणिस्तानात साधा वीज पुरवठा सुद्धा उपलब्ध नव्हता. 
> डॉक्युमेंट्रीनुसार, अशा परिस्थितीत लादेनची दुसरी पत्नी खदीजा त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. खदीजा एका विद्यापीठात प्राध्यापिका होती. 
> खदीजाने ओसामाला घटस्फोट दिला आणि आपल्या मुलाला घेऊन सौदी अरेबियात स्थायिक झाली. या घटनेमुळे ओसामा बिन लादेन खूप दुखी झाला. 
> ओसामा या सर्व घटनांसाठी अमेरिकेला जबाबदार धरत होता. अमेरिकेने सुदान सरकारवर दबाव टाकला नसता, तर त्याला देश सोडावे लागलेच नसते. 
> 9/11 हल्ल्यांवर लॉरेन्स राइट यांनी 'लूमिंग टॉवर' हे पुस्तक लिहिले होते. त्यामध्ये सुद्धा या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे.


अमेरिकाविरुद्ध युद्धाची घोषणा
डॉक्युमेंट्रीप्रमाणे, या घडामोडीनंतर लादेनने अमेरिका विरुद्ध 12 पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करून युद्धाची घोषणा केली. डॉक्युमेंट्री राइटर स्टीव कोल यांनी सांगितल्याप्रमाणे, ओसामा अमेरिकेला केवळ इस्लामिक जगाचाच नाही, तर आपल्या पर्सनल लाइफचा देखील शत्रू मानत होता. कोल पुढे म्हणाले, अमेरिकेने ओसामाला अफगाणिस्तानात पाठवताना जग त्याला विसरून जाइल असे समजले होते. मात्र, या उलट त्याने अमेरिका विरुद्ध युद्ध पुकारले आणि जगातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला.


पुढील स्लाइड्सवर पाहा, लादेन आणि त्याच्या कुटुंबियांचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...