आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनीच सांगितली काँग्रेस दुरवस्थेची कारणे; म्हणाले -‘अशोकराव, मधले स्पीडब्रेकर तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - साहेब, तुम्हाला थेट भेटता येत नाही, बोलता येत नाही. तुम्हाला भेटताना स्पीडब्रेकरच फार आहेत. ते दूर करा, अशी मागणी सोमवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना केली. काँग्रेसच्या दुरवस्थेची कारणेच एक प्रकारे त्यांनी सांगितली.

भोकर मतदारसंघातील दौऱ्यात अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कार्यक्रम कुसुम सभागृहात ठेवला. त्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आमंत्रित केले. चव्हाणांनी कोणताही आडपडदा न ठेवता कार्यकर्त्यांना बोलते केले. त्या वेळी कार्यकर्त्यांनी थेटच समस्या मांडल्या. त्यावर चव्हाणांनी माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडेच आहेत. तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन कधीही येऊ शकता, असे सांगितले. काही कार्यकर्त्यांनी तुमच्यासोबतचे काही कार्यकर्ते मिठाला न जागता तुम्हाला सोडून गेल्याचे सांगितले. काही कार्यकर्त्यांनी अमिता चव्हाण यांना लोहा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा आग्रह धरला. बेरोजगारीचा प्रश्नही उपस्थित होताच चव्हाण यांनी नांदेड-कृष्णूर इंडस्ट्रियल कॉरिडाॅर तयार करण्याचे आश्वासन दिले.