• Home
  • The record for solving 9 cube in 1.48 minutes under water

Genius book record / पाण्यात १.४८ मिनिटात ९ क्यूब सोडवण्याचा विक्रम, मुंबईच्या चिन्मय प्रभूची गिनीज बुकात नोंद

आपले कौशल्य इतरांना शिकवतोय चिन्मय
 

वृत्तसंस्था

May 21,2019 11:08:00 AM IST

मुंबई - मुंबईच्या चिन्मय प्रभूने पाण्यात राहून ९ पिरॅमिन्स (पिरॅमिडच्या आकाराचे रुबिकचे क्यूब) सोडवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड््समध्ये नाव झळकवले आहे. या यशाबद्दल सांगताना चिन्मय म्हणाला, मला क्युबिंग आणि स्वीमिंग दोन्ही आवडतात. यामुळे काही नवे घडवून दाखवण्याचा विचार मनात आला. या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून काही तरी नवे करण्याचा विचार केला. गििीज बुकच्या लोकांकडे या आधी काही विक्रम झाला आहे का? याची विचारणा केली. त्यानंतर पाण्यात राहून सराव केला. हळूहळू श्वास रोखून धरण्याची वेळ वाढवली. पूर्वी ३० ते ३५ सेकंद पाण्यात श्वास रोखून उभा राहायचो. परंतु नंतर १ मिनिट ५० सेकंदांपर्यंत श्वास रोखण्यात यश मिळवले.

आपले कौशल्य इतरांना शिकवतोय चिन्मय
चिन्मय आता आपले कौशल्य इतरांनाही शिकवतो आहे. त्याने यासाठी काेचिंग देणेही सुरू केले आहे. चिन्मय सांगतो, आठवड्याच्या शेवटी क्लास घेतो. सर्वात लहान विद्यार्थी ४ वर्षांचा आहे. चिन्मयचे पिता प्रदीप प्रभू यांनी सांगितले, चिन्मय असा विक्रम करेल, असे वाटले नव्हते. त्याने क्युबिंग सुरू केली तेव्हा त्याची आवड पाहून मी त्याला प्रोत्साहन देत गेलो. नंतर त्याने कठोर मेहनत घेतली. त्याला या खेळात विक्रमी यश मिळाले, असे ते म्हणाले.

X
COMMENT