आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Record Is A Person In Germany With The Highest Length Of Teeth In The World, 3.7 Centimetres; Recorded In Guinness World Records

जर्मनीच्या व्यक्तीचा दात आहे जगातील सर्वात जास्त लांबीचा दात, 3.7 सेंटीमीटर; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन : जर्मनीमध्ये मागच्यावर्षी वोडोपिजाचा दात काढला गेला. हा 1.46 इंच (3.7 सेंटीमीटर) आहे. हा जगातील सर्वात मोठा दात आहे. त्यामुळे मिजोचे नाव मंगलवारी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये दाखल झाले. आधी हा रेकॉर्ड भारताच्या उर्विल पटेलच्या नावे होता.  


मिजो मूळचा क्रोएशियाचा राहणार आहे. मात्र मागच्या काही वर्षांपासून जर्मनीच्या मॅन्ज शहरात तो राहात होता. डॉक्टर मॅक्स लुकासने सांगितले की, मिजोने आधी खूप वेदना होत असल्याचे सांगितले होते. तपासानंतर मागच्यावर्षी सप्टेंबरमध्ये त्याचा दात काढला गेला. डॉक्टरांनी एक्सरे पाहिल्यानंतर मिजोचे दात अविश्वसनीय आणि हैरान करणारे असल्याचे सांगितले. डॉ. मॅक्सने सांगितले की, मिजो जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याच्या तोंडामध्ये सूज आलेली होती आणि इंफेक्शनदेखील झाले होते. आम्ही त्वरित दात काढण्याचा सल्ला दिला. कारण या परिस्थितीमध्ये दुसरा कोणताही उपाय नव्हता. 

या आठवड्यात दिले जाईल सर्टिफिकेट... 
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सांगितले की, मिजोच्या दातांची लांबी 3.72 सेंटीमीटर (1.46 इंच) आहे. हा जगात आतापर्यंत भेटलेला सर्वात जास्त लांबीचा मानवी दात आहे. त्याला या आठवड्यात सर्टिफिकेट दिले जाईल. डॉ. मॅक्सने रेकॉर्ड दाखल करण्यासाठी निवेदन केले होते आणि या संपूर्ण प्रक्रियेत एका वर्ष लागले. 

भारतीय व्यक्तीच्या नावावर होता आधीच रेकॉर्ड...  
यापूर्वी हा रेकॉर्ड गुजरातचा विद्यार्थी उर्विल पटेलच्या नावे होता. फेब्रुवारी 2017 मध्ये 1.44 इंच (3.66 सेमी) लांबीचा उर्विलचा दात काढला होता. साधारणतः एका सामान्य दाताच्या वरच्या भागाची लांबी 8.70 मिलीमीटर आणि मुळाची लांबी 15.51 मिलीमीटर असते.