आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेपोत ०.२५% कपात, बँकांनी व्याजदर घटवला तर ३० लाखांच्या गृहकर्ज हप्त्यात ~ ४७४ बचत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सलग तिसऱ्यांदा रेपो दरात ०.२५% कपात केली आहे. यामुळे गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. समजा व्यापारी बँकांनी कर्जाचे व्याजदर याच प्रमाणात घटवले तर ३० लाख रुपयांच्या गृहकर्जाचा मासिक हप्ता (ईएमआय) ४७४ रुपयांनी कमी होऊ शकतो. औद्योगिक विकास दर उंचावण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने एकमताने हा निर्णय घेतला आहे. रेपो रेट कपातीच्या माध्यमातून बाजारात रोकडता वाढवण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये रेपो दरात ०.२५ % तर एप्रिलमध्ये ०.२५ % कपात करण्यात आली होती. अशा रीतीने यंदा आतापर्यंत रेपो दरात ०.७५ टक्के कपात झाली आहे. आता रेपो दर ५.७५ % झाला आहे. यापूर्वी जुलै २०१० मध्ये रेपो या स्तरावर होता.  
आणखी कपातीचे संकेत :  रिझर्व्ह बँकेने  आगामी काळात प्रमुख दरात कपातीचे संकेत दिले आहेत. कारण समितीने आपली तटस्थता राखण्यासाठी धोरणात बदल केले आहेत. त्यानुसार गरजेनुसार प्रमुख दरात कपात केली जाऊ शकते. 

 

पहिला निर्णय : रेपो कमी करून लोकांना कर्जात दिलासा देण्याचा प्रयत्न

गृहकर्ज : ५० लाख रुपये कर्जावर ७९७ रु. प्रतिमहा फायदा शक्य
रक्कम    नवा ईएमआय    जुना ईएमआय    फरक
20 लाख    17,167            17,483           316
30 लाख    25,751            26,225           474
50 लाख    43,708            44,405           797
> ३० लाख रुपयांपर्यंच्या कर्जावर सध्या ८.६० % व्याजदर आहे. गणना ८.३५% व्याजदरानुसार
> ५० लाख रुपयांपर्यंच्या कर्जावर सध्या ८.८५ % व्याजदर आहे. गणना ८.६० % व्याजदरानुसार
> गणना २० वर्षे मुदतीच्या कर्जाच्या आधारानुसार केली आहे.

वाहन कर्ज : १० लाख रु. कर्जावर ११२ रु. प्रतिमहा फायदा शक्य
रक्कम    नवा ईएमआय    जुना ईएमआय    फरक
3 लाख    6,249               6,286               37
5 लाख    10,416           10,477               61
10 लाख    20,831         20,953              112
>  कारसाठी कर्जावर सध्या ९.४० टक्के व्याज आहे. ही गणना ५ वर्षे मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात ०.२५ टक्के कपातीनंतर ९.१५ टक्के व्याजदरानुसार केली आहे.
>  वैयक्तिक कर्जाचे (पर्सनल लोन) व्याजदर तुलनेत जास्त अाहेत. त्यामुळे त्याचा ईएमआयमधील फरकही जास्त असू शकतो. 

मात्र, वास्तव असे की, रेपो दरात ०.५० % कपात, ग्राहकांना त्याच्या निम्माही फायदा मिळाला नाही 

 रिझर्व्ह बँकेने सलग तीन वेळा रेपो दर घटवला आहे. यापूर्वी दोन वेळा ०.५०  % कपात केली होती. मात्र बँकांनी याच्या निम्माही फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला नाही. 

बँक              एप्रिल २०१९                     फेब्रुवारी २०१९            एकूण
                  रेपो दर .२५% कपात        रेपो दर .२५% कपात      कपात
एसबीआय            0.1%                         0.05%                  0.15%
पीएनबी               0.1%                         0.1%                    0.20%
बँक ऑफ बडोदा    0.1%                         0.1%                    0.20%
एचडीएफसी बँक    0.05%                      0.05%                  0.10%

 

दुसरा निर्णय : आरटीजीएस, एनईएफटी व्यवहारशुल्क हटवले
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँक ट्रान्झेक्शन शुल्क हटवले आहे. आता आरटीजीएस आणि एनईएफटीवर शुल्क लागणार नाही. त्यानंतर बँका ग्राहकांकडून यासाठी शुल्क आकारणी करणार नाहीत. 

 

तिसरा निर्णय :  एटीएम शुल्क कमी करण्यासाठी समिती
एटीएमचे शुल्क कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक एक समिती नेमणार आहे. 
एटीएममधून पैसे काढण्यावर बँकांकडून होणाऱ्या शुल्क आकारणीचा ही समिती अभ्यास करणार आहे. त्यानंतर नव्याने शुल्कनिश्चिती होईल. शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव ही समिती देईल.


चौथा निर्णय :   विकास दराचा अंदाज घटवून ७.० टक्के केला
रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी अर्थात विकास दराचा अंदाज ०.२० टक्क्यांनी घटवला आहे. २०१९-२० साठी विकास दराचा अंदाज ७.० टक्के राहण्याची शक्यता वर्तवली आहे. यापूर्वी विकास दर ७.२% राहील असा अंदाज वर्तवला होता. 

बातम्या आणखी आहेत...