आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह तीन सभापतींनी दिले राजीनामे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह भाजपच्या तीन सभापतींनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाकडे सादर केले आहेत. परंतु, हे राजीनामे जिल्हाधिकारी मंजूर करु शकत नाही. तर याकरता आयुक्तांकडे राजीनामे सादर करावे लागतात. राजीनामे दिले आहेत, फक्त आयुक्तांकडे पाठवले नसल्याची माहिती भाजपा गटनेत्यांच्या वतीने त्यांचा मुलगा विनोद वाघ यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.


वीस दिवसांपूर्वी १९ डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ५२ सदस्यांनी ठराव मंजूर न केल्यामुळे वादग्रस्त ठरली होती. या विरोधाला जिल्हा परिषद अध्यक्षा यांनीही लोकसभेत पाहून घेऊ असे पत्रकारांना सांगत भाजपच्या जिल्हा नेत्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले होते. अखेर जिल्हा परिषदेच्या या सभेतील ठरावांना आज ७ जानेवारी राेजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरात मिळाली आहे. तर राष्ट्रवादीच्या सभापतीने राजीनामा दिला नसल्याची माहिती आहे. मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर येथे झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेनंतरची सभा १९डिसेंबर रोजी घेण्यात आली. या सभेत मागील सभेतील विषयानुसार काही कामांच्या ठरावांना मंजुरात देणे हा होता. काही कामेही या सभेत प्रास्ताविक करण्यात आले होते. परंतु, काँग्रेस व सेनेच्या वतीने या सभेत ठरावांना मंजुरातच देण्यात आली नव्हती. तर भाजपचेच जिल्हा परिषद सदस्य या ठरावाच्या विरोधात होते. साहजिकच सभा शांततेत व चहा पित पार पडली असली तरी ठरावांना मात्र मंजुरात मिळाली नव्हती.

 

दरम्यान निधीचे असमान वाटपावरूनही विरोधकांनी गहजब केला होता. त्या वेळी सत्तेत सोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही निधी मिळत नसल्याचे जाहीररीत्या सांगितले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील निधीचा घोळ समोर आला होता. या सभेनंतर दुष्काळी, आरोग्याचे ठराव नाकारल्यास जबाबदार अधिकारी नव्हेतर विरोधकच असल्याचे अध्यक्ष उमाताई तायडे यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी काहींनाच लोकसभेत दाखवून देऊ असा सुचित इशाराही दिला होता. दरम्यान हे प्रकरण प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचेपर्यंत पोहोचले होते व त्यांनीही आपण वृत्तपत्रातून वाचल्याचे कबूल करत हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले होते. तर आजच्या सभेनंतर तीन सभापतींसह जि. प. अध्यक्षांनी पक्षाकडे आपले राजीनामे सादर केले. पण राजीनामे मंजूर करण्याचे अधिकार आयुक्तांनाच आहेत.

बातम्या आणखी आहेत...