आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • The Responsibility Of Law And Order In The State Again Rests With Nagpurkar, Instead Of Experienced Ajit Pawar, Bhujbal, Anil Deshmukh Get The Responsibility

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पुन्हा नागपूरकरांकडेच, अनुभवी अजित पवार, भुजबळांना डावलून अनिल देशमुखांकडे गृह खाते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भर थंडीत नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असलेले अनिल देशमुख. - Divya Marathi
भर थंडीत नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असलेले अनिल देशमुख.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांना डावलून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकारमधील गृह खात्याची जबाबदारी अनिल देशमुखांवर साेपवल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. भ्रष्टाचाराचे अाराेप असलेल्या अजित पवार, छगन भुजबळ यासारख्या नेत्यांना या पदापासून दूर ठेवण्याचा उद्देश साध्य करण्याबराेबरच विदर्भात राष्ट्रवादीची ताकद अाणखी वाढवण्याच्या दृष्टीने पवारांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी काटाेलचे (जि. नागपूर) अामदार देशमुखांवर साेपवल्याचे मानले जाते. मागील पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही जबाबदारी हाेती, ती सरकार बदलले तरी पुन्हा 'नागपूकरां'कडेच राहिली अाहे.

मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे सर्वाधिक महत्त्वाची खाती आली आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या गृहखात्याचा समावेश आहे. या खात्यासाठी अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ अशा दिग्गज नेत्यांची फौज होती. तरीही पक्षात सौम्य व्यक्तिमत्त्वाच्या अनिल देशमुख यांच्याकडे हे खाते सोपविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने घेतला. त्यामागील काही कारणांची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


पहिले व महत्त्वाचे कारण म्हणजे अजितदादा, भुजबळांसारख्या नेत्यांना गृह खात्यापासून दूर ठेवण्याचे धोरण शरद पवार यांनी बाळगले असल्याचे मानले जाते. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी सोपविणे योग्य ठरले नसते. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काही महिने कारागृहात घालवावे लागल्याने छगन भुजबळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपविणे पवार यांना नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नव्हते, अशीही राष्ट्रवादीसह राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मग उरले जयंत पाटील व वळसे पाटील असे दोनच पर्याय राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे होते. मात्र, या नेत्यांकडे इतर महत्त्वाची खाती सोपविताना पवार यांनी विदर्भातील अतिशय विश्वासू आणि निष्ठावान नेत्याकडे ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. प्रदेशनिहाय समतोल साधणे, हे देखील यामागील एक कारण आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात पडझड सुरू असताना अनिल देशमुख यांनी अतिशय निष्ठेने शरद पवार यांना साथ दिली. या निर्णयामागे अनिल देशमुख यांचे नागपूरकर असणे हे देखील महत्त्वाचे ठरले आहे. नागपूर हा भाजपचा गड मानला जातो. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना स्वत:कडे गृहखाते ठेवले हाेते. नागपूरच्या कायदा आणि व्यवस्थेवर वारंवार प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीत विदर्भात राष्ट्रवादीला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे अनिल देशमुख यांना बळ देऊन विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेससाठी आशादायक वातावरण निर्माण करण्याची शरद पवार यांची योजना असल्याचे मानले जाते.

महिला सुरक्षा, गुन्हे सिद्धतेला प्राधान्य : अनिल देशमुख

'कायदा आणि सुव्यवस्था भक्कम करण्याचे आपले प्रयत्न अाहेतच. पण, महिलांची सुरक्षा आणि गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्याला आपले प्राधान्य असेल', अशी माहिती नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'दिव्य मराठी'ला दिली. राज्यात गुन्हेसिद्धतेचे अल्प प्रमाण ही समस्या आहे. त्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना करण्याचे आपले प्रयत्न असतील. गडचिरोलीसारख्या नक्षलप्रभावित जिल्ह्यात पोलिस दलांचा प्रभाव वाढवून हा जिल्हा नक्षलमुक्त करण्याचे प्रभावी धोरण राबविले जाईल. वाढती आर्थिक गुन्हेगारी हे देखील राज्यापुढील मोठे आव्हान आहे. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रभावी उपाययोजनांवर भर राहील', असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...