आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेस्तरॉने महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या मेन्यू ठेवले, 44 लाख रुपयांचा दंड लागला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीमा : पेरूमध्ये एका रेस्तरॉमध्ये महिलाआणि पुरुषांसाठी वेगवेगळे मेन्यू कार्ड ठेवल्यामुळे सुमारे 44 लाख (62 हजार डॉलर) चा दंड लागला आहे. अधिकाऱ्यांनी समुद्र किनाऱ्यावर बनलेल्या ला रोजा नॉटिका रेस्तरॉला महिला आणि पुरुष यांच्यात भेदभाव केल्यामुळे दोषी ठरवले गेले आहे. झाले असे की, रेस्तरॉमध्ये पुरुषांसोबत येणाऱ्या महिलांना गोल्डन कलरचे मेन्यू कार्ड दिले जाते तर पुरुषांना मिल्या रंगाचे नॉर्मल मेन्यू कार्ड. पुरुषांच्या कार्डमध्ये जिथे प्रत्येक डिशसमोर त्याची किंमत लिहिलेली असायची तर गोल्डन कार्डमध्ये केवळ डिशेज असायच्या त्याची किंमत लिहिलेली नसे.  


रेस्तरॉंचा दावा - वेगळे कार्ड यासाठी जेणेकरून महिलांचे डिशकडे लक्ष जावे. हाच विचार करून त्यांनी ओन्ली फीमेल मेन्यू कार्ड बनवले होते. अधिकाऱ्यांनी याला लिंग आधारित भेदभाव मानले. मात्र रेस्तरॉच्या मालकांनी आपल्या बॅचसाठी अनेक तर्क त्यांच्यासमोर मांडले. त्यांचे म्हणणे आहे की, अनेकदा  महिला जेवणाची ऑर्डर देताना डिशपेक्षा जास्त लक्ष त्याच्या किंमतीवर देतात, ज्यामुळे जेवणाच आनंद घेत नाहीत. तर विना किंमतीच्या मेन्यू कार्डमधून ऑर्डर देताना त्यांचे लक्ष केवळ पदार्थांकडे असते आणि त्या आवडती डिश ऑर्डर करू शकतात. 

महिला आणि पुरुषांसाठी एकसारखे कार्ड असायला हवे... 
पेरूच्या नॅशनल इंस्टीट्यूट फॉर द डिफेंस ऑफ फ्री कंपीटिशन अँड द प्रोटेक्शन ऑफ इंटलेक्चुअल प्रॉपर्टीच्या लिलियाना सेरोन म्हणाला की, महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करणे चुकीचे आहे. त्यामुळे रेस्तरॉमध्ये दोघांसाठी एकसारखे मेन्यू कार्ड असायला हवे. रेस्तरॉच्या मालकांचा प्रयत्न भले चांगला असो, पण अखेर यामुळे असा विचार वाढत गेला असता जो महिला-पुरुषांमध्ये भेदभावाला मानतात. 

वेगळे मेन्यू कार्ड लॉस एंजिलिसमध्येही बंद झाले होते...  
ला रोजा नॉटिका रेस्तरॉ स्थानिक लोकांसोबत परदेशी टूरिस्ट्समध्येही पॉप्युलर आहे. त्यामुळे त्यांनी एकच मेन्यू कार्ड ठेवले पाहिजे. रेस्तरॉ मालकांनी आपल्या स्टाफला देखील स्पष्ट करायला हवे की, भेदभाव सहन केला जाणार नाही. याचसोबत त्यांना 62 हजार डॉलर दंडदेखील भरावा लागेल. जेणेकरून भविष्यात कुणीही असे करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच्या परिणामांची माहिती असावी. यापूर्वी 1980 मध्ये लॉस एंजिलिसच्या एका रेस्तरॉमध्येदेखील महिला आणि पुरुषांसाठी वेगळे मेन्यू कार्ड्स ठेविले गेले होते, ज्याचा खूप विरोध झाल्यानंतर ते बंद केले गेले. 

बातम्या आणखी आहेत...