आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांनी ब्रिटन वगळता युरोप यात्रेवर लावले निर्बंध, माझ्यासाठी अमेरिकींच्या जिवापेक्षा काहीच मोठे नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युरोपात ९६० जणांचा मृत्यू, २३ हजारांहून जास्त जणांना कोरोना व्हायरसची बाधा
  • सुरक्षा सल्लागार म्हणाले, चीनने प्रकरणे लपवण्याचा केला प्रयत्न
  • चीनच्या बाहेर सर्वाधिक प्रकरणे इटली, दक्षिण कोरिया व इराणमध्ये; इराणने मागितले ३७ हजार कोटी

वॉशिंग्टन /लंडन/ बीजिंग  - कोरोना विषाणूच्या संसर्गाला राेखण्यासाठी अमेरिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी युरोपवर नवे निर्बंध जाहीर केले. आगामी ३० दिवसांसाठी अमेरिकेतून युरोपला विमानांची उड्डाणे होणार नाहीत, असे ट्रम्प यांनी गुरुवारी टीव्हीवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून जाहीर केले. कोरोनाच्या संसर्गाला राेखण्यासाठी अमेरिकेने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला. १२०० जणांना बाधा झाली आहे. युरोपने संसर्गाला रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलली नाहीत, असा आरोप ट्रम्प यांनी केला. प्रसार माध्यमांनी अशा संकटाच्या काळात एकजुटीच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. आमच्याकडे एक शत्रू आहे. जगाचा शत्रू आहे कोरोना व्हायरस. आपण त्याला तत्काळ पराभूत केले पाहिजे. अमेरिकी नागरिकांचे जीवन व सुरक्षेहून महत्त्वाचे माझ्यासाठी काहीही नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले. सुरक्षा सल्लागार म्हणाले, चीनने प्रकरणे लपवण्याचा केला प्रयत्न 

ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट आे ब्रायन म्हणाले, चीनने या समस्येच्या उच्चाटनासाठी चांगल्या उपाययोजना करण्याऐवजी ती लपवण्याचाच प्रयत्न केला. परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनीही वुहान कोरोना व्हायरस असे संबोधले. अलर्ट करणाऱ्या डॉक्टरला गप्प करण्यात आल्याचे पुरावे आहेत. ट्रम्प यांचे निर्बंध चुकीचे : युरोपीय राष्ट्र

युरोपीय संघातील २६ देशांवर अमेरिकेचा एकतर्फी बंदीचा निर्णय चुकीचा असल्याची टीका संघाने केली. जगभरात संसर्ग वाढत चालला असला तरी दैनंदिन जीवन थांबलेले नाही. अशा परिस्थितीत हा निर्णय चुकीचा आहे.इटलीत औषधी दुकाने चालू, आयर्लंडही बंद


इटलीत औषधी व खानपानाची दुकाने सोडल्यास सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयर्लंडने देखील गुरुवारी देशभरातील शाळा, महाविद्यालये व बाल सुविधा केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 

चीनच्या बाहेर १० पैकी ७ प्रकरणे तीन देशांची 
 
चीनबाहेरील प्रकरणांत प्रत्येकी १० पैकी ७ प्रकरणे इटली, दक्षिण कोरिया,इराणमधील आहेत. इटलीत ८२७ मृत्यू झाले. दक्षिण कोरियात ७ हजार ५१३, तर ५४ जणांचा मृत्यू झाला. इराणमध्ये २३७ जणांचा मृत्यू झाला.आरोग्य संघटनेचा दावा : वय जास्त असलेल्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यताही जास्त


> इराणने कोरोनाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे ३७ हजार कोटींचा निधी मागितला.
> अमेरिकेच्या कॅपिटल हाऊसला एप्रिलपर्यंत पर्यटकांच्या दृष्टीने बंद करण्याचा निर्णय. 
> राष्ट्राध्यक्ष निवडणूक : बाइडेन व सँडर्सने सभा केल्या रद्द, मीडियातून संदेश देणार. 
> वुहानमध्ये २४ तासांत केवळ ८ प्रकरणे समोर, आतापर्यंत सर्वात कमी आकडा
> श्रीलंकेत गुरुवारपासून देशभरातील शाळा बंद, २० एप्रिलपर्यंत सुटी राहील.
 

हॉलीवूडचे टॉम हँक्स, पत्नी रिटा, स्पेनच्या मंत्र्यांनाही संसर्ग, सर्वात वाईट काळ संपला, चीन सरकारने केला दावा 
 
> हॉलीवूड अभिनेता टॉम हँक्स व त्यांची पत्नी अभिनेत्री रिटा विल्सन यांनाही संसर्ग झाला. रिटाने अलीकडेच सिडनीच्या ऑपेरा हाऊसमध्ये सादरीकरण केले होते. तेथे टॉम हँक्सही उपस्थित होते.
 
> स्पेनची समानता मंत्री आइरिन माँटेरोही बाधित झाले. माँटेरो यांना त्यांचे सहकारी व उपपंतप्रधान पॅब्लो इग्लेसियास यांच्यासह स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. लवकरच सर्व सदस्यांची चाचणी होईल.


> चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयाेगाने कोरोना व्हायरसच्या सर्वात वाईट टप्प्यातून बाहेर पडल्याची घोषणा केली. कमिशनचे प्रमुख फेंग म्हणाले, सर्व काही नियंत्रणात आहे. घाबरून जाण्याची गरज नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...