आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Result Of Corona: International Tourism 30% Cheaper, Multiple Destinations Tour Canceled

कोरोनाचा परिणाम : आंतरराष्ट्रीय पर्यटन 30% स्वस्त, अनेक ठिकाणचे प्रवास रद्द

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद : चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूची भीती पसरली आहे. याचा उद्योग-व्यवसायासह पर्यटन व्यवसायावरही परिणाम झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन देखील ३० टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. उन्हाळ्यात सिंगापूर, बँकाॅक, जपान, चीन, दक्षिण कोरियासह इतर पर्यटनस्थळी फिरायला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांनी कोरोना विषाणूमुळे या ठिकाणांकडे पाठ वळवली आहे. तर, दुसरीकडे जॉर्जिया, टर्की, मॉस्कोसह इतर देशांच्या प्रवासाला पर्यटक पसंती देत आहेत.

दमण-दीव आरोग्य विभागाने नवीन निर्देश जारी केले

सिल्व्हासा : चीनमधील वुहान प्रांतातील हुबेई शहरातून निमोनियाच्या रूपाने सुरू झालेला कोव्हीड-१९चा उद्रेक दिवसेंदिवस जगातील इतर देशांमध्ये पसरत आहे. चीनशिवाय जगातील ५८ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतात आतापर्यंत ५ पॉझिटिव्ह रोगी आढळले होते, ज्यांची प्रकृती ठीक आहे. कोरोनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणिबाणी घोषित केली आहे. कोरोना उद्रेक लक्षात घेता भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, सर्व भारतीयांना चीन, कोरिया, इटली, इराण, जपान, व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, नेपाळ आणि सिंगापूरमध्ये आवश्यक नसल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला दिलेला आहे.

१० फेब्रुवारी २०२० नंतर परदेशातून प्रवेश करून आलेल्या प्रवाशांना १४ दिवस घरात वेगळे राहण्याचा, वेगळ्या खोलीत झोपण्याचा, कुटुंबातील इतर सदस्यांसोबत मर्यादित संपर्क ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे. तर शिंकताना, खोकताना नाकावर रुमाल लावावा आणि लक्षणे आढळल्यास त्वरित जवळील आरोग्य केंद्रात जाण्यास सांगितले आहे. याबाबत माहिती देताना दादरा नगर हवेली आणि दमण दीव आरोग्य केंद्राचे संचालक डॉ. व्ही. के. दास यांनी सांगितले की, भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार विभागाने तयारी पूर्ण केली आहे. आरोग्य विभागाकडून देखील  प्रवास सल्ला पत्रकानुसार सर्व प्रवाशांची तपासणी केली जात आहे. राज्यात आतापर्यंत कोणत्याही प्रवासी किंवा व्यक्तीमध्ये या कोरोना विषाणूची लक्षणे आढळलेली नाही. घसा दुखणे, सर्दी-खोकला आणि ताप या रोगाची लक्षणे आहेत. यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. असेही डॉ. दास यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...