आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलभूषण जाधव प्रकरणात आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेग - कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानच्या शिक्षेला भारताने दिलेल्या आव्हानावर बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयासमाेर सुनावणी हाेणार आहे. निवृत्त नाैदल अधिकारी ४९ वर्षीय जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठाेठावली हाेती. 


घुसखाेरी व दहशतवादाचा ठपका ठेवून पाकिस्तानच्या काेर्टाने एप्रिल २०१७ मध्ये शिक्षा ठाेठावली. त्यावर भारताने तीव्र आक्षेप घेत आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली हाेती. आता १७ जुलै राेजी त्यावर हाॅग येथील पीस पॅलेसमध्ये न्यायमूर्ती अब्दुलकावी अहमद युसूफ निकालाचे वाचन करतील, असे कोर्टाने जाहीर केले हाेते. फेब्रुवारीत ४ दिवस सुनावणी.  


निकालाबद्दल काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही. निकालाची आम्ही प्रतीक्षा करत आहाेत, असे पाक परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते माेहंमद फैजल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले हाेते. भारतानेदेखील या प्रकरणात आपले सविस्तर म्हणणे मांडले आहे. व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा भारताने आपल्या युक्तिवादात मांडला आहे. 

बातम्या आणखी आहेत...