आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या वादावरील निकाल भावी पिढ्यांसाठी परिणामकारक ठरेल; मोल्डिंग ऑफ रिलीफ’वर नवे शपथपत्र दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणावरील निकाल भावी पिढ्यांवर परिणामकारक तर ठरेलच, शिवाय देशातील राजकीय व्यवस्थेलाही नवे रूप देईल, असे मुस्लिम पक्षकारांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डासह इतर मुस्लिम पक्षकारांनी सोमवारी मोल्डिंग ऑफ रिलीफवर आपला युक्तिवाद सुप्रीम कोर्टात सादर केला. अगोदर बंद पाकिटात युक्तिवाद मांडलेल्या मुस्लिम पक्षकारांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने पर्यायी दिलासा मिळण्याबाबत लेखी म्हणणे मांडण्याची परवानगी दिली होती. या पक्षकारांनी बंद पाकिटात म्हणणे दाखल केल्यानंतर इतर अनेक पक्षकारांनी यावर आक्षेप घेतले होते.
 
 

सरन्यायाधीशांनी सुनावले... माझ्या टेबलवर जे शपथपत्र बंद पाकिटात आहे ते वृत्तपत्रांत छापून येत आहे. मग ते शपथपत्र तिथेच पडू द्या, अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी या वेळी मुस्लिम पक्षकारांना सुनावले.
 
> सुन्नी वक्फ बोर्डात वाद. एक गट तडजोडीसाठी तयार तर दुसऱ्या गटाचा वादग्रस्त जमिनीवर दावा.
> हिंदू पक्षकारांनुसार, मध्यस्थीबाबत दाखल करण्यात आलेल्या नव्या अहवालाचा निकालावर परिणाम नाही.
 

निकाल १५ नोव्हेंबरपर्यंत शक्य
सुनावणी करणाऱ्या घटनापीठाचे अध्यक्ष व सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. १६ नोव्हेंबरला शनिवार आणि १७ रोजी रविवारी असल्याने निकाल १५ नोव्हेंबरच्या आत दिला जाण्याची शक्यता आहे.