आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगाव धरणात उजव्या कालव्याचे पाणी, भर दुष्काळात भागली २२ गावांची तहान!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बीड : जिल्ह्यात यंदा अकराही तालुक्यांत दुष्काळ आहे. माजलगाव धरणही मृत साठ्यात आहे. माजलगाव शहर , बीड शहर व तालुक्यातील २२ गावांची तहान भागावी म्हणून २१ डिसेंबर २०१८ रोजी पैठण येथील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ३४ दलघमी पाणी सोडण्यात आले. २४ डिसेंबर सायंकाळपासून पाणी धरणात येऊ लागले. या पाण्याचा विसर्ग ९०० क्युसेक आहे. २१ जानेवारीपर्यंत हे पाणी सुरू राहणार आहे. या पाण्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढली आहे. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात ७०० हेक्टरवर प्रशासनाने गाळ पेरा केला असून पाण्याबरोबर चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. 


> ४३१.८० मी. धरणाची साठवण क्षमता
>  २२ गावांची तहान भागली 
> ७०० हेक्टर गाळपेरा झाला 
> ११९०००  हेक्टर जमीन सिंचनाखाली आली 
> १ लाख १९ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली 

 

माजलगाव येथील सिंदफणा नदीवर १९७८ मध्ये धरणाच्या कामास सुरुवात झाली. १९८४ मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. प्रकल्पामुळे २२ गावांचे पुनर्वसन झाले. या प्रकल्पाची पूर्ण पाणी साठवण क्षमता पाहिली तर ४३१.८० मीटर एवढी असून एकूण लांबी सहा हजार ३०० मीटर आहे. धरणमाथा ४५३.६० मीटर आहे. नदीपात्र धरणाची उंची ३१ मीटर आहे. या प्रकल्पामुळे माजलगाव परभणी व नांदेड जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ४०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आलेली आहे. 
 

 

बातम्या आणखी आहेत...