आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाधारणत: जास्त तेल आणि गरम मसाल्यांचा वापर करून पनीर बनवले जाते. म्हणजेच पनीर बनवण्याच्या पद्धतींमध्ये निष्काळजीपणा करणे किंवा याच्या घट्ट ग्रेव्हीमुळे वजन वाढते आणि आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे पनीर बनवण्याची योग्य पद्धत जाणून घेणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला चांगली चवही मिळेल आणि आरोग्यही चांगले राहील.
सलाड बनवून खा
डीप फ्राइड पनीरचे व्यंजन खाण्याऐवजी पनीरचे सलाड खावे. कच्चे पनी खाणे तुमच्यासाठी चांगले राहील. त्यासाठी पनीरच्या तुकड्यांवर मीठ व मिरेपुड टाकूनही खाऊ शकता.
प्रथिने मिळतील
याशिवाय पनीर ब्रोकली सलाड, ओट्स पालक पनीर उत्तपा, पनीर टोस्ट, पनीरची खीर आदीदेखील बनवू शकता. पनीर घरच्या घरीच दुधापासून बनवू शकता. हे आरोग्यासाठी फायद्याचे असतात.
असे ठेवा सुरक्षित
पनीर नेहमी फ्रिजमध्ये ठेवा आणि एक-दोन दिवसांच्या आत त्यांचा वापर करा. पनीरपासून कोणताही पदार्थ तयार करण्यापूर्वी त्यामध्ये टाकल्या जात असलेल्या भाज्या चांगल्या प्रकारे धुऊन घ्याव्यात, जेणेकरून त्यातील जंतू नष्ट होतील.
का खावे पनीर?
पनीर खाल्ल्याने स्नायू बळकट होतात. पनीर शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. वजन कमी करण्यास सहायक पनीरमध्ये हाय प्रोटीन असल्याने याचे कमी प्रमाणात सेवन केल्यानेही भरपेट जेवण केल्यासारखे वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.