आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात मोठे धार्मिक केंद्र म्हणून अयोध्यानगरीचा उदय शक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत मंदिर बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता वाढली आहे. मंदिर उभारणीबरोबरच अयोध्या देशच नव्हे, तर जगभरातील लोकांना आकर्षित करेल. त्यामुळेच अयोध्या व्हॅटिकन आणि मक्का यासारखे मोठे आंतरराष्ट्रीय धार्मिक शहराच्या रूपात विकसित होऊ शकते. अयोध्येत त्यादृष्टीने क्षमता आहे. कारण भौगाेलिक परिस्थिती व मोठ्या शहरांच्या जवळ असल्याने या शहराला वाव असल्याचे तज्ञांना वाटते. २०१८-१९ या वर्षात अयोध्येत सुमारे १.५ लाख लोक आले होते. तज्ञांच्या मते, अयोध्येचा सुनियोजित विकास केल्यास वर्तमान परिस्थितीच्या तुलनेत पर्यटक तसेच भाविक १५ पटीने वाढू शकतात.  अयोध्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र  कशा प्रकारे बनू शकते हे जाणून घेण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांसोबत चर्चा केली. त्यांच्या मते, सर्वात आधी अयोध्येच्या ब्रँडिंगची गरज आहे. राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील हॉटेल व रेस्तराँ चेन सुरू करण्यासाठी सामंजस्य करार करायला हवा.  अयोध्या केवळ हिंदूंच नव्हे तर बौद्ध, जैन समुदायांसाठीही महत्त्वाचे ठिकाण आहे हे विसरून चालत नाही. म्हणूनच येथे एक भव्य संग्रहालय उभारले जायला हवे. ते रामचरित मानसच्या सात खंडाच्या धर्तीवर साकारले जाऊ शकते. त्यात अयोध्येच्या ऐतिहासिक महत्त्वाचेही दर्शन घडवावे. 

शरयूत क्रूझ
अयोध्येतून वाहणाऱ्या शरयू नदीचे पूर्ण शुद्धीकरण करणे, काशीच्या धर्तीवर भ‌व्य घाटांचे बांधकाम आणि बोटी, स्टिम, क्रूझ नदीतून चालवले जावेत. त्यातून लोकांना रोजगार व सरकारला महसूल मिळणार आहे. 

आंतरराष्ट्रीय विमानतळ 
अयोध्येचे इतिहास काळापासून थेट नेपाळ, दक्षिण कोरिया, थायलंड व इंडोनेशियासारख्या देशांसोबत संबंध आहेत. म्हणूनच अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करायला हवी. २०१४ मध्ये अशा प्रकल्पासाठी सामंजस्य करारही झाला होता, परंतु तो प्रकल्प पुढे रखडला. 

नवा मास्टर प्लॅन
२२१ मीटर उंच भगवान रामाची मूर्ती साकारण्याचे काम सुरू झाल्यानंतर अयोध्येचा मास्टर प्लॅन नव्याने तयार करावा. त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त रोजगार, नवीन बाजारपेठ, उद्याने, रुंद रस्ते मिळतील.  

आधुनिक रेल्वे, बसस्थानक
आंतरराष्ट्रीय सुविधा असलेले रेल्वेस्टेशन व बसस्थानकाची गरज. एसी लोअर फ्लोर बसेस, तेजस शताब्दी सुविधा असलेल्या रेल्वे गाड्यांद्वारे अयोध्येला जोडले जावे. त्यातून पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.