Health / संगणकावर बैठे कामामुळे निर्माण होतो या समस्यांचा धोका

तासन््तास संगणकावर काम केल्यामुळे केवळ शरीराचे शारीरिक नुकसान होत नाही, तर मानसिकही खूप त्रास होतो.

रिलिजन डेस्क

Jul 11,2019 12:15:00 AM IST

तासन््तास संगणकावर काम केल्यामुळे केवळ शरीराचे शारीरिक नुकसान होत नाही, तर मानसिकही खूप त्रास होतो. म्हणून संगणकावर काम करताना काही गोष्टींकडे लक्ष द्या.


कार्पल टनल सिंड्रोम
उशिरापर्यंत कीबोर्डवर टाइप करणे किंवा माउस चालवल्यामुळे कार्पल टनल सिंड्रोम होऊ शकते. यामुळे मांसपेशींचे दुखणे वाढू शकते.


कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम
उशिरापर्यंत संगणकाच्या स्क्रीनवर सारखे पाहिल्यामुळे संबंधित कित्येक समस्या होऊ शकतात. जसे डोळ्यांची दृष्टी कमी होणे, अंधुक दिसणे, रुक्षपणा वाढणे किंवा ग्लुकोमा आदी.


आर्थरायटिस
खूप वेळ बसल्यामुळे खांदे, कंबर आणि पाठीमध्ये वेदना होतात, ज्यामुळे हाडे कमजोर होतात. कित्येकदा आर्थरायटिसचे कारण होऊ शकते.


लठ्ठपणा
संगणकासमोर सारखे बैठे काम केल्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते. यामुळे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणामुळे मधुमेह किंवा रक्तदाबासारख्या समस्या होऊ शकतात.


स्ट्रेस डिसऑर्डर
जास्त कामाच्या तणावामुळे चिंता, तणाव आणि उदासीनता असते. यामुळे इतर मानसिक समस्यांची शक्यता वाढू शकते.


करा हे उपाय
1. कामाच्या दरम्यान मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा.
2. सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामात वेळ घालवा.
3. तुमच्या आवडत्या कामाला प्राधान्य द्या, जेणेकरून तुमचा तणाव दूर होईल.
4. तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे.

X
COMMENT