Home | International | Other Country | The robot has stinted in a patient's chest

रोबोटच्या मदतीने ३२ किमीवरील रुग्णाच्या हृदयात डॉक्टरांनी टाकला स्टेंट; जगातील पहिली टेलिरोबोटिक कोरोनरी सर्जरी

वृत्तसंस्था | Update - Dec 08, 2018, 10:42 AM IST

३२ किमी दूर अंतरावर बसलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रोबोटला आदेश देऊन केली शस्त्रक्रिया .

  • The robot has stinted in a patient's chest

    अहमदाबाद- जगात माणसाच्या हृदयावर पहिली टेलिरोबोटिक कोरोनरी सर्जरी बुधवारी गुजरातमध्ये करण्यात आली. हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या एका वयस्क महिलेचे ३२ किमी दूर अंतरावर बसलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रोबोटला आदेश देऊन शस्त्रक्रिया केली.

    प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डाॅ. तेजस पटेल यांनी गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरात बसून तेथून ३२ किमी दूर अंतरावर असलेल्या अहमदाबादेतील अॅपेक्स हार्ट इन्स्टिट्यूटमधील कालोलनिवासी महिलेच्या हृदयात रोबोटद्वारे धमनीतील अडथळा दूर केला. काही मिनिटात झालेल्या टेलिरोबोटिक हृदय शस्त्रक्रिया एका मोठ्या स्क्रीनवर मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माध्यमांना दाखवण्यात आली. पटेल यांनी सांगितले,ही प्रक्रिया चिकित्सा जगतात एक नवा मार्ग सुरू करेल. रोबोटला आदेश देण्यासाठी त्यांनी १०० एमबीपीएस इंटरनेट लाइनचा वापर करण्यात आला. ती २० एमबीपीएस असली तरी काही अडचण येत नाही. या प्रक्रियेसाठी अमेरिकेच्या कोरिंडस व्हॅस्क्यूलर रोबोटिक्स इंकची कोरपाथ तंत्राचा वापर करण्यात आला.

    ही प्रक्रिया आता महाग असली तरी पुढे स्वस्त होईल. यामुळे हजारो किमी दूर अंतरावर असलेल्या रुग्णांवर तज्ज्ञांच्या मदतीने रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. इंटरनेट बंद पडल्यास ३० सेकंदाच्या आत सर्व प्रक्रिया हाताने होऊ शकते.

Trending