आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Robots Consist The Actuator Generates Vibration And Is Powered Externally Because No Batteries

मुंगीएवढ्या आकाराचे रोबोट सजर्रीमध्ये ठरतील फायदेशीर, अल्ट्रासाउंड वेब आणि व्हायब्रेशनने होतात कंट्रोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अमेरिकेच्या जॉर्जिया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान रोबोट बनवला आहे. दोन मिलीमीटर एवढा असलेल्या या 3डी रोबोटला मानवाच्या शरीरात टाकून उपचार केले जाऊ शकतात. मेडिकल क्षेत्रातील विशेषज्ञ, या रोबोटचा वापर सर्जरीमध्ये करू शकतील.  प्रत्येक रोबोट आपल्यापेक्षा 4 टक्के जास्त स्पेस एका सेकंदात कव्हर करतो. 

 

मायक्रोमेकॅनिक्स आणि मायक्रोइंजीनियरिंग जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अध्ययनानुसार, रोबोट जखमा ठीक करण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो. हे अल्ट्रासाउंड वेब आणि व्हायब्रेशनने कंट्रोल केले जाऊ शकते. 

 

या फील्डमध्ये खूप काम होण्याची शक्यता आहे... 
जॉर्जिया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे असिस्टंट प्रोफेसर आजाद अंसारीने मीडियाला सांगितले की, आम्ही इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, बॉयोलॉजी आणि फिजिक्सला एकत्र करून काही नवीन बनवण्याचे प्रयत्न करत आहोत. हे क्षेत्र खूप मोठे आहे. यामध्ये प्रत्येक प्रकारचा शोध होण्याची शक्यता आहे. 

 

टिनी 3डी रोबोटमध्ये पेजोइलेक्ट्रिक एक्यूटर लावले गेले आहे, जे व्हायब्रेशन करते, यामुळे रोबोट सक्रिय होतात. रोबोटला कोणत्याही प्रकारच्या बॅटरी पॉवरची गरज नसते. रोबोट एवढा छोटा आहे की, यामध्ये बॅटरी लावायला स्पेसच नाही. 

 

शास्त्रज्ञांनी सांगितले, प्रत्येक रोबोटचे डिजाइन वेगळ्या पद्धतीने केले गेले आहे. त्यामुळे गती, पायांचा आकार, बॉडी डायमीटर, एवढेच नाही तर डिजाइनदेखील वेगळी आहे. अतिशय लहान असल्यामुळे हे व्हायब्रेशनवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात.