आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'देशासाठी महात्मा गांधींनी केलेला त्याग व कार्य विसरता येणार नाही' संजय आवटे यांचे प्रतिपादन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी हाेत महात्मा गांधी यांनी १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात सगळीकडे जल्लाेष सुरू असताना त्यांनी हिंदू-मुस्लिम यांच्यात सलाेखा राखण्यासाठी बंगालमध्ये उपाेषण केले. गांधीजींनी देशासाठी केलेला त्याग अाणि त्यांचे कार्य देश कधीही विसरू शकत नाही, असे प्रतिपादन दिव्य मराठी'चे राज्य संपादक संजय अावटे यांनी गुरुवारी केले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अायाेजित 'एकता संमेलना'मध्ये ते बाेलत हाेते. या वेळी काँग्रेसचे पुणे अध्यक्ष रमेश बागवे, माजी अामदार बाळासाहेब शिवरकर, माेहन जाेशी, अॅड.अभय छाजेड, संजय बालगुडे, गाेपाल तिवारी, अविनाश बागवे, लता राजगुरू, साेनारी मारणे, मुख्तार शेख, वीरेंद्र कराड उपस्थित हाेते.

अावटे म्हणाले, १९१६ मध्ये महात्मा गांधी दक्षिण अाफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. १९२४ साली ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. महात्मा गांधींचा सत्याग्रह अाणि अहिंसा या मार्गाला प्रेरित हाेऊन लाखाे भारतीयांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. महात्मा गांधी, पंडित नेहरू व डाॅ.बाबासाहेब अांबेडकर यांच्यात काही विषयांवर मतभेद हाेते. मात्र, ते देशाच्या हितासाठी काम करत हाेते. या नेत्यांच्या त्यागामुळे देशाला महात्मा गांधींसारखे राष्ट्रपिता मिळाले. पंडित नेहरूंसारखे पुराेगामी विचाराचे पंतप्रधान अाणि डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्यासारखे घटनेचे शिल्पकार लाभले. गांधीजींनी अापल्या राजकारणासाठी कधीही धर्माचा वापर केला नाही. भारतातील बहुभाषिक संस्कृती अाणि भाैगाेलिक वैविध्य हे जगात वेगळेपण अाहे.

एनआरसीचे आंदोलन सरकारला सांभाळता येत नाही

हिंदू-मुस्लिम असे वेगळेपण सांगून एकमेकांबद्दल भीतीचे राजकारण जाणीवपूर्वक काही जण निर्माण करत अाहेत. पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त मुस्लिम अाहेत. त्यामुळे जे काेणत्याही गाेष्टीवर पाकिस्तानमध्ये जा, असा टाेमणा मारतात त्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. एनअारसीविराेधात अांदाेलन सरकारला सांभाळता येत नाही, कारण हा देश बहुधर्मीय, बहुसंस्कृतीपणाचा अाहे. देश स्वतंत्र झाला त्या वेळी काेण काेणत्या धर्माचा, जातीचा, गरीब-श्रीमंत, साक्षर-निरक्षर असा भेदाभेद न करता सर्वांना पहिल्या दिवसापासून समान मताधिकार घटनेने दिला गेला. देशातील मूल्यव्यवस्था टिकवून ठेवणे अापल्या सर्वांचे काम अाहे, असेही ते म्हणाले.
 

बातम्या आणखी आहेत...