आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्यंत दुर्गम भागात वैद्यकीय मदत पोहोचवेल ‘साहस’ ड्राेन, आपत्ती व्यवस्थापनाची कामगिरी बजावण्यासाठी ड्राेन अत्यंत उपयाेगी ठरणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - एखाद्या अत्यंत दुर्गम भागात अपघात घडल्यास जखमींपर्यंत मदत पोहोचवणे अवघड जाते. पण, आता फक्त अपघातग्रस्तच नव्हे, तर अन्य काेणत्याही रुग्णापर्यंत ड्रोनच्या मदतीने त्वरित वैद्यकीय उपचार पाठवणे साेपे झाले आहे. मुंबई येथील अभियंता तरुणांनी यासाठी ‘साहस’ या अभिनव ड्राेनची निर्मिती केली आहे. वैद्यकीय उपचार वेळेत पाेहोचवण्याबराेबरच प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनाची कामगिरी बजावण्यासाठीही हा ड्राेन अत्यंत उपयाेगी ठरणार आहे.  


इंडियन अॅकॅडमी अाॅफ ड्राेन्सचे व्यवस्थापकीय संचालक ओंकार भाेसले, सहव्यवस्थापक रोहित शिर्के यांच्यासह अनिशा भाेसले, चिराग पटेल यांनी २५ अन्य अभियंत्यांच्या मदतीने हा ड्रोन तयार केला आहे.  सुमारे साडेचार किलो वजनाचा हा ड्रोन दाेन किलाे वजनाची औषधे सहज नेऊ शकतो.  गरज पडल्यास या ड्राेनच्या मदतीने रक्ताची पिशवी, अाॅक्सिजन मास्कही पाठवता येऊ शकताे.  ड्राेनवर एक ‘ट्रान्समीटर रिसिव्हर कॅमेरा’ बसवलेला असेल. त्याच्या मदतीने डाॅक्टर रुग्णालयात बसून अपघातग्रस्तांची स्थिती जाणून त्याप्रमाणे तातडीने उपचार व्यवस्था करू शकतात. या कॅमेऱ्याची  क्षमता ५ किमीपर्यंत असल्याने डाॅक्टरांनाही नेमका अंदाज येऊ शकताे. ड्राेन निर्मितीचा अमेरिकेत अभ्यास केल्यानंतर हे सर्व अभियंते आता मुंबईत ड्राेन अॅकॅडमीच्या माध्यमातून हे आता तरुणांना ड्राेन निर्मितीचे प्रशिक्षण देत आहाेत. “साहस’च्या निर्मितीसाठी त्यांना ६ महिने लागले. विविध प्रकारच्या संशाेधन आणि विकासाच्या चाचण्यांसाठी लाखभर रुपये खर्च झाले.

बातम्या आणखी आहेत...