आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video/ औरंगाबादच्या पिंपळे परिवाराने ज्येष्ठा गौरींसमोर उभारला संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील प्रसंगांचा देखावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - संत श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या थोर संतांपैकी एक आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव येथे झाला होता. त्यांचे कार्य व साहित्य यांची माहिती तरूण पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने औरंगाबादेतील कांचन नगर येथील सौ.संगीता मिलिंद पिंपळे यांच्या घरी ज्येष्ठा गौरींसमोर देखावा उभारण्यात आला होता. 3 फुटांची विठ्ठलाची मूर्ती या देखाव्यातील ठळख वैशिष्ट्य होते. 

या देखाव्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील खालील प्रसंग दाखवण्यात आले आहेत. 
1) ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताईची विनवणी.
2) पैठण येथे रेड्यामुखी वेद वदविले.
3) श्री क्षेत्र नेवासा येथील कणेरेश्वर मंदिरातील खांब. जेथे ज्ञानेश्वरी लिहीली.
4) शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण येथे प्रस्थान.
5) चांगदेवाचे गर्वहरण .चालणारी भिंत.
6) ब्रह्मगिरी पर्वत. 
7) ग्रंथ दर्शन व साहित्य. 
8) संजीवन समाधी.
9) वारकरी सांप्रदायाची सुरूवात. 
10) इंद्रायणी काठी देवाची आळंदी.
11) रांगोळीतील त्यांची रेखाटलेले प्रतिमा.