आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्तीचे अर्ज या वर्षी ऑफलाइन घेणार नाहीच: कितीही दबाव आला तरी निर्णय कायम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला   मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज या वर्षी फक्त ऑनलाइनच स्वीकारले जातील. कितीही दबाब आणला तरी एकही अर्ज अाॅफलाइन स्वीकारणार नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी दिले.   


अकाेल्यातील विकासकामांचा अाढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी साेमवारी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी शासनाने ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू केले आहे. परंतु गतवर्षी हे पोर्टल काही तांत्रिक कारणामुळे पूर्णत: सुरूच होऊ शकले नाही. शेवटी महाडीबीटीऐवजी त्यापूर्वीचे ‘महाइस्कॉल’ या पोर्टलवरच अर्ज करण्याचे अावाहन करण्यात अाले. परंतु काही कारणामुळे लाभार्थींना तेही करणे शक्य झाले नसल्यामुळे राज्य सरकारने अाॅफलाइन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला हाेता. या वर्षी मात्र महाडीबीटीत दोष िशल्लक न राहिल्यामुळे हे अर्ज ऑनलाइनच भरले जावेत, असे अावाहन मुख्यमंत्र्यांनी केले.  

 
शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करताना महाविद्यालये आणि संबंधित कार्यालयांकडून विलंब केला जातो. त्यामुळे ऐनवेळी अर्ज ऑफलाइन स्वीकारावे लागतात.  या वर्षी असे काहीही होऊ देऊ नका. महाविद्यालयांना वरचेवर पत्र लिहा आणि विशेष म्हणजे त्या पत्रांचे रेकॉर्ड ठेवून योग्य ती कारवाई करता येईल, अशी स्थिती निर्माण करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 

समृद्धी महामार्गाला नकाेय अटलजी, ठाकरेंचे नाव; विदर्भवाद्यांची भूमिका

मुंबई-नागपूर या द्रुतगती महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजपच्या गाेटातून केली जात अाहे, तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली अाहे. या वादात अाता विदर्भवाद्यांनीही उडी घेतली अाहे. मात्र अटलजी व बाळासाहेब ठाकरे या दाेन्ही दिवंगत नेत्यांची नावे सरकारने या महामार्गाला देऊ नयेत अशी मागणी या समितीने केली अाहे. अॅड. श्रीहरी अणेंनीही अशीच मागणी केली. दरम्यान, या महामार्गाला काेणाचे नाव द्यायचे याबाबतचा निर्णय याेग्य वेळी घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी अकाेल्यात बाेलताना सांगितले.  

 

स्वतंत्र विदर्भाला अनुकूल नसल्याने नावाला विराेध 
अटलबिहारी वाजपेयी व बाळासाहेब ठाकरे या दाेन्ही नेत्यांची स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी अनुकूल भूमिका नव्हती. त्यामुळे यापैकी एकाचेही नाव देऊ नये. याबाबत प्रस्ताव अाल्यास अामचा विराेध राहील,’ अशी भूमिका विदर्भवाद्यांनी घेतली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...