आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुरांच्या आखाड्यावर बिबट्याचा धुमाकूळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव - ऊस तोडण्यासाठी आलेल्या मजुरांच्या आखाड्यावर बिबट्याने धुमाकूळ घातला. मजुरांनी सतर्कता दाखवल्याने बिबट्याच्या तावडीतून गायीची सुटका करण्यात यश मिळाले. अंतरवाली टेंभी शिवारात रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्याने या भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. 


सागर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोड करण्यासाठी हे मजूर आले असून अंतरवाली टेंभी-पाडुळी शिवारात त्यांचा आखाडा आहे. रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्लाबोल करत राधाकिसन नाथा कांबळे यांच्या गाईवर झडप घातली. बिबट्या व गाईच्या ओरडण्याने मजूर जागे होऊन खोप्याबाहेर धावत आले. मजूर अालेले पाहताच बिबट्याने बाजूच्या उसात धूम ठोकली. दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली अाहे. वन विभागाचे वनपाल आर.एस. राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दरम्यान आखाड्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्याने ऊसतोड मजुरांत भीती निर्माण झाली आहे. वैद्यकीय अधिकारी संतोष आस्कद यांनी जखमी गाईवर उपचार केले.

 

आखाड्यावर उसाच्या पाचटाचे तात्पुरते झोपडे केलेले असल्याने तसेच ऊस तोडण्यास गेल्यावर झोपड्यात केवळ लहान मुले राहत असल्याने त्यांची काळजी लागली आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ऊसतोड मुकादम सुभाष भोजने यांनी वनपाल राठोड यांच्याकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...