आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Second Fire Broke Out In Fifteen Days, Killing 9, Jumping Woman And Her Daughter Saved

पंधरा दिवसांतील दुसरे अग्नितांडव, 9 ठार, उडी मारणारी महिला व तिच्या मुलींचा जीव वाचला

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : दिल्लीत पंधरा दिवसांत आगीची दुसरी मोठी दुर्घटना झाली. किराडी भागात तीन मजली इमारतीत कापडाच्या गोदामाला आग लागल्याने ९ लोकांचा मृत्यू झाला. तीन जण घटनास्थळीच ठार झाले, तर ६ जणांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. ठार झालेल्यांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. पूजा नावाच्या महिलेने तिच्या मुली आराध्या आणि सौम्या यांच्यासह जीव वाचवण्यासाठी शेजारच्या इमारतीवरून उडी मारली. यामुळे तिघींचा जीव वाचला. आग रविवारी रात्री उशिरा लागली.

आगीची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी अालेल्या अग्निशमन दलाच्या आठ बंबांच्या मदतीने आगीवर सोमवारी पहाटे ३.५० वाजता नियंत्रण मिळवण्यात यश आले. इमारतीचे मालक आणि पूजाचे पती अमरनाथ झा घटनेच्या वेळी हरिद्वारला होते. इमारतीच्या तळमजल्यावर कपड्यांचे गोदाम होते आणि वरच्या तीन मजल्यांचा वापर निवासासाठी केला जात होता. या आधी ८ डिसेंबर रोजी दिल्लीतील अनाज मंडी भागात चार मजली इमारतीला आग लागल्याने ४३ जणांचा मृत्यू झाला होता.

कारगिलमध्ये ट्रॉमा सेंटरला आग 

लडाखमधील कारगिल येथील जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरला सोमवारी सकाळी आग लागली. या आगीत ट्रॉमा सेंटरचे मोठे नुकसान झाले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...