Home | Sports | Cricket | Off The Field | The second one-day match between India-Australia tomorrow

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना उद्या; भारताची नजर बराेबरीवर; उद्या 'करा वा मरा'चा सामना

वृत्तसंस्था | Update - Jan 14, 2019, 08:37 AM IST

गेल्या सात वर्षांत भारताने ऑस्ट्रेलियात एकूण १८ वनडे सामने खेळले असून त्यात केवळ ४ विजय मिळाले आहे.

 • The second one-day match between India-Australia tomorrow

  अॅडिलेड- ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला सामना ३४ धावांनी गमावला. दुसरा वनडे मंगळवारी खेळवला जाईल. हा सामना भारतास जिंकणे गरजेचे आहे. पराभव झाल्यास भारताचे तीन गोष्टींचे नुकसान होईल. एक - मालिका हातातून जाईल. कारण ऑस्ट्रेलिया २-० ने आघाडी घेईल. दोन - विश्वचषकाच्या तयारीला मोठा झटका बसेल. कारण आता फक्त ११ वनडेनंतर थेट विश्वचषकात खेळायचे आहे. अशात एक पराभव सर्व कमजोरी समोर आणेल. तीन - भारत सात वर्षांत चौथ्यांदा ऑस्ट्रेलियात मालिका गमावेल. यापूर्वी सीबी मालिका २०१२, कार्लटन मिड तिरंगी मालिका २०१५ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१६ मध्ये द्विपक्षीय मालिका भारताने गमावली.

  गेल्या सात वर्षांत भारताने ऑस्ट्रेलियात एकूण १८ वनडे सामने खेळले आहेत. यात केवळ ४ विजय मिळाले आणि १२ मध्ये पराभव झाला. एक अनिर्णीत व एक बरोबरीत राहिला. भारताने अखेरच्या वेळी २००८ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही वनडे मालिकेत विजय मिळवला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात तिरंगी मालिकेत बेस्ट ऑफ थ्री फायनल्समध्ये यजमानाला २-० ने हरवले होते.

  भारताने अॅडिलेडमध्ये ८ सामने जिंकले :
  अॅडिलेडमध्ये भारताने एकूण १४ सामने खेळले. ८ विजय, ५ पराभव झाला. या मैदानावर भारत व ऑस्ट्रेलियाचे एकूण पाच सामने झाले. भारताने एक विजय मिळवला व चारमध्ये पराभव झाला.

  विजय शंकर, शुभमन संघात :
  हार्दिक पांड्या व लोकेश राहुलच्या निलंबनानंतर वेगवान गोलंदाज व अष्टपैलू विजय शंकर आणि गेल्या वर्षी १९ वर्षांखालील विश्वचषकात जबरदस्त कामगिरी करणारा शुभमन गिलचा संघाचा समावेश करण्यात आला आहे. विजय शंकर दुसऱ्या वनडेसह टीमसोबत जुडला आहे. दुसरीकडे गिल न्यूझीलंड दौऱ्यावर टीमसोबत होता. दोघांचे अद्याप पदार्पण झालेले नाही. शंकरने पाच टी-२० सामने खेळले आहेत.

  २०१२ मध्ये धोनीने अखेरच्या वेळी ४ चेंडूंत १२ धावांसह मिळवून दिला विजय :
  महेंद्रसिंग धोनीच्या फॉर्मची भारताला चिंता आहे. गेल्या सामन्यात धोनीने ५१ धावा काढल्या. मात्र त्यासाठी त्याने ९६ चेंडू खेळले.

Trending