आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या सौंदर्याचे रहस्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुसान चित्रपट महोत्सवात एका कोरियन फॅशन मासिकाने भूमी पेडणेकरला ‘फेस ऑफ एशिया’ हा पुरस्कार दिला. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिलीच भारतीय कलाकार. तेथे तिचा ‘डॉली, किट्टी और वो’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारतातही प्रदर्शित होणार आहे. भारतीय अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा होते, तेव्हा मधुबाला, सुचित्रा सेन, माधुरी दीक्षित आणि जुही चावलाचा उल्लेख होतो. ‘हॅप्पी भाग जाएगी’ चित्रपटात एक संवाद आहे. सभी मधुबाला को चाहते रहे परंतु मधुबाला किसे चाहती थी. चित्रीकरणासाठी वेळ न दिल्यामुळे मधुबालावर एका न्यायालयात खटला दाखल झाला. चित्रपटाचा नायक दिलीपकुमारने निर्मात्याच्या बाजूने जबाब देत मान्य केले होते की, तो मधुबालाच्या प्रेमात आहे. ही परंपराच आहे की, आपले स्टार अभिनेते नेहमीच शक्तिशाली पक्षाच्या बाजूने उभे राहत आले आहेत. ते नेहमीच घाबरलेले का असतात? भूमी पेडणेकर मधुबाला वा सुचित्रा सेनसारखी सुंदर नाही. मात्र तिला आशियाचा चेहरा समजले गेले. ती सर्वसामान्य भारतीय महिलेसारखी दिसते. तिला पाहिले की आपली शेजारी आठवते. जया बच्चनचे सौंदर्यही काहीसे असेच. असे म्हणतात की लैला सुंदर नव्हती. मात्र मजनूच्या नजरेत ती सौंदर्याची खाणच. सौंदर्य पाहणाऱ्याच्या नजरेत असते. बुसानच्या फॅशन मासिकाच्या संपादकानुसार भूमी आशियातील सर्वात सुंदर चेहरा.   शांताराम यांच्या ‘नवरंग’ चित्रपटात कवी नायक आपल्या कल्पनेतील स्त्रीसौंदर्याची प्रशंसा कवितेत करतो. मात्र त्याला खूप काळानंतर उमगते की चेहरा दुसरा-तिसरा कोणी नसून त्याच्या पत्नीचाच आहे. राज कपूरच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये नायकाने नायिकेचा अर्धा जळालेला चेहरा पाहिलेला नसतो. खरे तर पुरुष त्या हरणासारखे असतात जे सुगंधामागे धावत असते. तो सुगंध त्याच्या नाभीतूनच येत असतो. गेल्या काही दशकांत सौंदर्यशास्त्राने खूपच प्रगती केली आहे. चपटे नाक सुडौल बनवले जाते. ओठांमध्ये इंजेक्शन देऊन ते मादक बनवता येतात. मात्र त्याचबरोबर एका इशारा दिला जातो की, या ओठांचे चुंबन घेता येत नाही. काही कलाकार फेस लिफ्टही करतात. आपल्यातील अनेक वयस्क अभिनेत्यांनी असे केले आहे. चेहऱ्यावरून वय कळते. त्यावरून त्याचा अभिनयही कळतो. हा चेहरा जणू एक पुस्तक असतो. ते पाहायचे नव्हे तर वाचायचे असते. शिवम नायकच्या तापसी पन्नू अभिनीत ‘नाम शबाना’च्या क्लायमॅक्समध्ये दहशतवादी चेहरा बदलण्यासाठी रुग्णालयात दाखल होतो. हा प्रकार तो नेहमी करत असतो. त्यामुळे पोलिसांच्या हाती तो लागलेला नसताे. तापसी पन्नू एका भारतीय गुप्तचराप्रमाणे रुग्णालयात दाखल होऊन ऑपरेशन थिएटरमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करते. भूमी पेडणेकरचा चेहरा एका सामान्य स्त्रीचा आहे. मात्र तिच्या साधेपणातच सौंदर्य दडले आहे. तिच्या चित्रपटांनी प्रियंका चोप्रा, कॅटरिना कैफ आणि दीपिका पदुकोणच्या चित्रपटांपेक्षा बक्कळ कमाई केली आहे. भूमी पेडणेकरचे सौंदर्य समोरच्याला घायाळ करत नाही. ती आपल्या सामान्यपणामुळेच असामान्य दिसते. तिच्या चेहऱ्यातून ऊर्जा प्रवाहीत होते. नूतनच्या पतीने ‘सूरत व सिरत’ चित्रपट बनवला होता. चारित्र्य खरे सौंदर्य असते असा संदेश तो देतो. असे म्हणतात की, शायर जिगर मुरादाबादी सुंदर नव्हते. मात्र शायरी म्हणायचे तेव्हा अतिशय सुंदर दिसायचे. मनुष्याची तर्कप्रधान विचारशैली त्याच्या चेहऱ्याला सुंदर बनवत असते. अशोककुमार अभिनीत ‘मेरी सूरत, तेरी आंखें’चा नायक कुरूप समजला जातो. त्याची वेदना सचिनदेव बर्मन आणि शैलेंद्र यांनी अशी प्रकट केली. ‘पूछो न कैसे मैंने रैन बिताई, इक पल बीता एक युग जैसे, युग बीते मोहे नींद न आई.’

बातम्या आणखी आहेत...