आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Sensex Collapses, Leaving Investors Losing Rs 3.46 Lakh Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्स कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.46 लाख कोटी रुपयांचे नुकसान

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • गेल्या दहा वर्षांत बजेटच्या दिवशी सेन्सेक्समध्ये मोठी घसरण नोंदली

मुंबई/नवी दिल्ली- शेअर बाजारांत गुंतवणूकदारांना अर्थसंकल्पातून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र, त्यांची अर्थसंकल्पातील घोषणांमुळे निराशा झाली. गुंतवणूकदारांवर विक्रीचा दबाव वाढला. व्यवहाराच्या अखेरच्या क्षणी सेन्सेक्स १,०९२.२५ अंक कोसळून ३९,६३१.२४ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. सायंकाळी व्यवसायाच्या समात्तीवर हा ९८७.९६ अंक♦(२.४३%)वर बंद झाला. हा सेन्सेक्स आतापर्यंतच्या चौथ्या आणि १० वर्षांतील अर्थसंकल्पाच्या दिवशी सर्वात मोठा घसरला.

याआधी सेन्सेक्स २४ ऑक्टोबर २००८ रोजी १०७०.६३ अंक घसरून ८७०१.०७ च्या स्तरावर बंद झाला होता. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी वित्ती तुटीस जीडीपीच्या ३.३% पर्यंत मर्यादीत ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते. सकाळी व्यवसायाच्या सुरुवातीनंतर बाजार मर्यादीत कक्षेत होता. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, की वित्तीय तूट जीडीपीच्या ३.८% पर्यंत पोहोचू शकतो. विक्रीचा दबाव सुरू झाला. याशिवाय प्राप्तिकराअंतर्गत सूट परत घेतल्यावर प्राप्तिकर स्लॅबच्या पर्यायी स्लॅबचा प्रस्ताव ठेवला.

डिव्हिडंड डिस्ट्रिब्यूशन टॅक्स जमा करण्याचा भार कंपन्यांवरील हटवून तो प्राप्त करणाऱ्यावर टाकला. सेन्सेक्सच्या धर्तीवर एनएसई निफ्टीत ३००.२५ अंका(२.५१% )ची घसरण पाहायला मिळाली. हा निर्देशांक ११,६६१.८५ च्या पातळीवर बंद झाला. बाजाराच्या या घसरणीत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे मूल्य ३.४ लाख कोटीी रुपयांनी कमी झाले. व्यवसाय सत्राच्या समाप्तीत बीएसईचे बाजार भांडवल १५३.०५ लाख कोटी झाले. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक घसरण आयटीसीच्या समभागांत राहिली. ही ६.९७% घसरला.

गेल्या दहा वर्षांत बजेटच्या दिवशी सेन्सेक्समध्ये मोठी घसरण नोंदली


> 26 फेब्रुवारी 2010    प्रणव मुखर्जी    +175.35
> 28 फेब्रुवारी 2011    प्रणव मुखर्जी    +122.49
> 16 मार्च 2012    प्रणव मुखर्जी    -209.65
> 28 फेब्रुवारी 2013    पी. चिदंबरम    -290.87
> 10 जुलै 2014    अरुण जेटली    -72.06 
> 28 फेब्रुवारी 2015    अरुण जेटली    +141.38
> 29 फेब्रुवारी 2016    अरुण जेटली    -152.30
> 1 फेब्रुवारी 2017    अरुण जेटली    +485.68
> 1 फेब्रुवारी 2018    अरुण जेटली    -58.36
> 1 फेब्रुवारी 2019    पीयूष गोयल    +212.74
> 5 जुलै2019    निर्मला सीतारामण    -394.67
> 1 फेब्रुवारी 2020    निर्मला सीतारामण    -987.96

वित्तीय तूट वाढणे गुंतवणूकदारांसाठी नकारात्मक नाही


अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी अर्थसंकल्पातील अपेक्षा खूप वाढल्या आहेत. वित्तीय तूट वाढणे सकारात्मक आहे. येत्या वित्त वर्षात झाल्यास बाजाराचे मनोधैर्य आणखी वाढते. त्यामुळे बाजारात घसरण  दिसली.म- विनोद नायर, हेड ऑफ रिसर्च, जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेस

देशातील समभागधारकांकडून लाभांशावर करवसुली योग्य नाही
 
लाभांश वाटप कर हटवण्याचा प्रस्ताव विदेशी गुंतवणूकदारांसाठी चांगला आहे. मात्र, देशातील गुंतवणूकदारांना लाभांश याआधीच कंपनीद्वारे कंपनी कर चुकवल्यानंतर दिला जातो. समभागधारक कंपनीचे मालक असतात. अशात सरकार पुन्हा कर वसुली करत आहे.-निर्मल जैन, फाउंडर व चेअरमन, आयआयएफएल