आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्समध्ये तीन वर्षांतील सर्वात माेठी घसरण, ७९३ अंकांनी खाली; हीरो, पीएनबीच्या शेअरमध्ये वर्षातील सर्वात माेठी घसरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पात शेअर बायबॅकवर कर आणि लिस्टेड कंपन्यांमध्ये किमान सार्वजनिक शेअर भागीदारीत वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती. याचा परिणाम सोमवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. या घोषणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक धारणा तयार झाल्याने शेअर बाजारात २०१९ नंतरची सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली.


टक्केवारीच्या दृष्टीने पाहिल्यास ही एप्रिल २०१६ नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे दोन टक्क्यांनी घसरला. विक्रीच्या माऱ्यामुळे मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला सेन्सेक्स ७९२ अंकांच्या घसरणीसह ३९ हजारांच्या पातळीच्या खाली येत ३८,७२० या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी २५२ अंकांच्या घसरणीसह ११,५५८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. सार्वजनिक क्षेत्रातील बँक, रिअल्टी, पॉवर आणि वाहन क्षेत्रावर याचा सर्वाधिक परिणाम झाला. 


ज्या शेअरवर सर्वाधिक परिणाम झाला त्यामध्ये बजाज फायनान्स, ओएनजीसी, एनटीपीसी, हीरो मोटर कॉर्प आणि मारुती यांचा समावेश आहे. वास्तविक येस बँक, एचसीएल टेक आणि टीसीएसच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली. या शेअरमध्ये ५.५६ टक्क्यांपर्यंतची वाढ दिसून आली. अर्थसंकल्पातील घोषणांव्यतिरिक्त जागतिक बाजाराचाही परिणाम झाला असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. बाजारातील घसरण इतकी तेजीने झाली की, हीरो मोटरकॉर्प, पीएनबी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि दिलीप बिल्डकॉनच्या शेअरमध्ये सात वर्षांतील सर्वात मोठी घसरण झाली. तेजीने घसरण झाल्याने निफ्टी ५० पैकी ४६ शेअरमध्ये घसरण झाली.

 

गुंतवणूकदारांत निराशा

 दीर्घकाळातील भांडवली वाढ कर केवळ वैयक्तिक अाणि त्यांच्याशी जाेडलेल्या संस्थांवरच लागेल असे सांगितले असून हेदेखील बाजारात घसरणीचे एक कारण आहे. सरकारने कंपन्यांना याच्या बाहेर केले आहे. सरकारने तयार केलेले हे धोरण चांगले असले तरी त्याचा परिणाम दिसण्यास काही कालावधी लागेल. 
- देवेन चोकसे, एमडी केआर चोकसे