आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स १,९४२ अंकांनी गडगडला, आजवरची सर्वात मोठी घसरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुंतवणूकदारांची संपत्ती ६.८४ लाख कोटींनी घटली
  • घसरणीची ४ कारणे: परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळला

मुंबई - सोमवारी सेन्सेक्सने इतिहासातील एकाच दिवसातील सर्वात मोठी घसरण नोंदवली. कोरोना व्हायरस, कच्च्या तेलातील घसरण व येस बँकेच्या संकटामुळे बीएसई सेन्सेक्स १,९४२ अंकांनी (५.१७%) गडगडून ३५,६३४.९५ अंकांवर बंद झाला. एकदा तर तो २,४६७ अंकांनी कोसळला होता. ही इंट्रा-डेमधील आजवरची सर्वात मोठी घसरण आहे. निफ्टीही ५३८ अंकांनी कोसळून १०,४५१.४५ अंकांवर बंद झाला. या घसरणीमुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांची संपत्ती ६.८४ लाख कोटी रुपयांनी घटली. बीएसईतील कंपन्यांचे मार्केट कॅप १४४.३१ लाख कोटींवरून १३७.४७ लाख कोटींवर आले. ओएनजीसीला १६%, रिलायन्स इंडस्ट्रीजला १२% फटका बसला. यंदा सुरुवातीच्या २ महिन्यांतच सेन्सेक्स ५,६७५ अंकांनी कोसळला आहे.



घसरणीची ४ कारणे: परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळला


1. कोरोना : सलग ५ दिवसांपासून अमेरिकी व युरोपचे शेअर बाजार या व्हायरसच्या भीतीने गडगडत आहेत. 


2. कच्चे तेल: कोरोनामुळे तेलाची मागणी घटली आहे. सौदीने कच्च्या तेलाचे दर ३३% घटवलेत.


3. येस बँक संकट : अस्थैर्याने बँकिंग यंत्रणेबाबत गुंतवणूकदारांतील भयाचे वातावरण कायम आहे. 


4. एफपीआय: मार्चमध्ये फक्त ५ सत्रांतच बाजारातून  तब्बल १३,१५७ कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत. 



अमेरिकी बाजारात १५ मिनिट ट्रेडिंग थांबवली
 
कोरोना व तेलातील घसरणीमुळेे जगभरातील बाजार रेड झोनमध्ये होते. अमेरिकी बाजारात तर १५ मिनिटे ट्रेडिंग थांबवावी लागली. अमेरिकी बाजार ७% कोसळले. लंडनचा एफटीएसई १०० शेअर निर्देशांक ६.३% घसरला. युरो क्षेत्रात फ्रँकफर्ट डीएएक्स ३० निर्देशांक ६.८% व पॅरिस बाजाराचा सीएसी ४० निर्देशांक ६.९ टक्क्यांनी गडगडले.



मिनरल वॉटरपेक्षा कच्चे तेल स्वस्त, नवा नीचांक
 
कच्च्या तेलाचे दर १९९१ आखाती युद्धानंतर नीचांकावर गेले. सोमवारी स्थानिक वायदे बाजारात कच्च्या तेलाचे दर ३०% घसरून २,२०० रु./बॅरलच्या खाली आलेे. एका बॅरलमध्ये १५९ लिटर कच्चे तेल असते. म्हणजे २ लिटर तेलाचे दर १४ रुपये होतात. याउलट पाण्याची एक लिटरची बाटली कमीत कमी  २० रुपयांची असते. 



२ वर्षांत कच्च्या तेलाचे दर निम्म्याने उतरले, मात्र पेट्रोल-डिझेल जैसे थे


वर्ष     ब्रेंट क्रूड     पेट्रोल     डिझेल

    (डॉलर/बॅरल)     रु./लि.    रु./लि.

2016     36.93     56.61     46.43


2017     56.36     71.14     59.02

2018     64.26     71.57     62.25

2019     63.71     71.81     67.12

2020     33.20     70.59     63.26





बातम्या आणखी आहेत...