आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Sensex's A Record Rise: 1015 Points For The First Time, 40,100 Crosses, And Nifty Ahead Of 12000

इतिहासात प्रथमच Sensex 40 हजारांच्या पार! 1085 अंकांनी वाढला, Nifty 12 हजारांच्या वर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये एनडीए बाजी मारणार असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान  इतिहासात प्रथमच सेन्सेक्स 40 हजारांच्या पार गेला आहे. सुरुवातीला सेंसेक्समध्ये 481.56 अंकांची वाढ होऊन 39,591.77 वर सुरू झाला. कामकाजादरम्यान 1015 अंकांनी वाढून 40,124.96 असा विक्रमी स्तर गाठला. निफ्टीची सुरूवात 163 अंकानी वाढून 11,901.30 वर पोहोचली. तर कामकाजा दरम्यान 303 अंकांनी वाढून 12,041.15 च्या आतापर्यंतच्या उच्च स्तरावर पोहोचला. 

 

एसबीआयच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांची वाढ

इंडसइंड बँक आणि एसबीआयच्या शेअरमध्ये 6-6 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसत आहे. लार्सन अॅण्ड टूब्रो मध्ये 3.5 % आणि पावर ग्रिडमध्ये 2.5% टक्क्यांनी उसळी घेतली आहे. दूसरीकडे वेदांता आणि टाटा मोटर्स मध्ये 1-1 टक्क्याचे नुकसान झाले आहे. 

 

निफ्टीचे  टॉप-5 गेनर

शेअर       चढ
अडाणी पोर्ट्स                8.32%     
येस बँक     8.03%
बीपीसीएल     6.86%
इंडसइंड बँक     6.06%
एसबीआय     5.94%

 

निफ्टीचे टॉप-5 लूझर

शेअर       उतार
आयटीसी                      0.92%       
हिंडाल्को      0.88%
वेदांता      0.87%
विप्रो      0.42%
डॉ. रेड्डी      0.34%

 

बाजारात दिवसभर चढ-उतार राहील -  विश्लेषक

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, एक्झिट पोलनुसार परिणाम राहिले तर बाजारात 10% रॅली येऊ शकते. पण विपरीत परिणाम जरी आले तर यामध्ये इतकीच निच्चांकी येऊ शकते. आज मोठ्या प्रमाणात चढ-उतार राहण्याची शक्यता आहे. निकालाच्या परिणामाची स्थिती संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल यामुळे शुक्रवारी देखील बाजारावर परिणाम दिसेल.  


26 पैशांनी मजबूत झाला रूपया
आज रुपया डॉलरच्या तुलनेत 26 पैशांनी वाढून 69.40 वर पोहोचला. 69.45 वर सुरूवात झाली होती. बुधवारी रूपयामध्ये 6 पैशांची वाढीसोबत 69.66 वर बंद झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...