आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिक्वेल आणि उत्तम पटकथेस मागणी राहणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकुमार हिरानी

चित्रपटगृहात न जाणारा एक माेठा वर्ग आहे. तरीही ताे प्रत्येक शाे, चित्रपट पाहत असताे. हे बिंच वाॅचर्स आहेत. घरीच साेफ्यावर लाेळत तासन््तास माेबाथल-टॅब स्क्रीनकडे टक लावून पाहत असतात. सिनेमा आणि अाेटीटी प्लॅटफाॅर्मवर जबरदस्त काम हाेत आहे हे उघडच आहे. याच काैशल्याने नवा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. जाेवर या दाेन्ही ठिकाणच्या कामात उत्तम दर्जा असेल ताेवर लाेक पाहत राहतील. २०२० मध्ये हा कल आणखी वाढलेला दिसेल. नववर्ष बाॅलतवूडमधील प्रत्येकासाठी खूप काम मिळवून देणारे ठरेल. सध्या काही चित्रपटांच्या सिक्वेलवर काम हाेत आहे तसेच अाेटीटी प्लॅटफाॅर्मच्या विस्तारामुळे सर्व कलावंत आणि सहायकांनादेखील काम मिळते अाहे. नववर्षात मीदेखील 'मुन्नाभाई...' आणि 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल काढण्याच्या विचारात आहे. तथापि, जाेवर याची पटकथा सर्वाेत्तम हाेत नाही ताेपर्यंत काम करण्यातला आनंद मिळणार नाही. केवळ पैसे कमावण्यासाठी आम्ही सिक्वेल काढत नाहीत. ताऱ्यांच्या संदर्भात सांगायचे तर या वर्षात शाहरुख खान नक्कीच काहीतरी छान घेऊन येतील. शाहरुखने नेहमीच अनाेख्या चित्रपटाची निवड केली आहे. 'झीराे' असाे की 'फॅन' या दाेन्हीत त्याची भूमिका अगदीच भिन्न आहे. एकात ताे ठेंगणा हाेता, तर दुसऱ्यात दुहेरी भूमिका साकारली हाेती. हा परस्परांशी विराेधाभासच हाेता. काही चित्रपट बाॅक्स अाॅफिसवर चालतात, तर काही चालत नाहीत. याचा अर्थ असा नाही की, अभिनेता खराब आहे किंवा त्यात काही उणिवा अाहेत.

नववर्षात महिलाविषयक चित्रपट अधिक येतील अशी चिन्हे आहेत. मात्र प्रत्येक प्रेक्षकाची आवड निराळी असते. त्यानुसार ताे चित्रपट निवडताे, पाहताे. महिला केंद्रित चित्रपट त्यांच्या नैसर्गिक आवडीचा भाग असताे. हिंदी चित्रपट उद्याेगात फराह खान, जाेया, रिमा, काेंकणा सेन, साेनाली बाेस व नंदिता दास यांच्यासारख्या सक्षम महिला दिग्दर्शक आहेत. अनेकांनी उत्तम चित्रपट दिले आहेत. मला वाटते या वर्षात त्याचे प्रमाण वाढलेले दिसेल. याचप्रमाणे टीव्ही मालिका, अाेटीटी प्लॅटफाॅर्मवर खूप काम हाेत आहे. आज तुम्ही एखादा कलावंत, अभिनेता किंवा तंत्र सहायकास फाेन कराल तर ताे कुठल्या ना कुठल्या कामात व्यग्र असलेला दिसेल. काही लाेक जाहिराती बनवत आहेत. काही डाॅक्युमेंट्री करीत आहेत. एकंदरीत, चांगल्या पटकथेला अधिक मागणी आहे. पटकथेबाबत माझा दृष्टिकाेन जरा वेगळा आहे. अभिजात जाेशीसाेबत आपल्या आयुष्यातील संस्मरणीय किश्श्यांवर चर्चा करताे. त्यातूनच पात्रांची निर्मिती करताे. उदा. 'थ्री इडियट्स'मध्ये आम्ही व्हायरस आणि चतुर दाेन व्हिलन बनवले हाेते. रँचाे जाे अॅक्शन करताे, आम्ही चतुरला त्यावर रिअॅक्शन पाेट्रे करीत राहिलाे. त्यामुळे कथेत नावीन्य येते. एडिटिंगने मला दिग्दर्शक बनण्यास मदत केली. मला वाटते की, आपल्या विवेकाशी प्रतारणा करून लाेकांची करमणूक करण्याचा प्रयत्न करू नये. मी अभ्यास, संशाेधन खूप करताे. संजूच्या बायाेपिकसाठी आम्ही ताे पॅराेलवर असताना २५ दिवस सायंकाळी ५ वाजेपासून रात्री ३ वाजेपर्यंत साेबत हाेताे. पूर्ण कथा १००० पानांची झाली. अभिनेता डाेळ्यासमाेर पटकथा कधीच लिहीत नाही. काही जुन्या आठवणी आठवल्या की, त्यातून नव्या कथेस जन्म देता येताे. बालपण महाविद्यालयीन काळातील मस्ती, शरारत, वेडेपणातून अनेक कथांचा उगम हाेताे. २०१९ मध्ये अशा काही कथा पाहायला मिळतील. तात्पर्य २०२० हे वर्ष उत्तमाेत्तम कथानकांचे राहील हे निश्चित!

जे चित्रपटगृहात जात नाहीत, ते वेब शाेला बिंज वाॅच करतात. घरीच तासन््तास पाहत राहतात. जाेवर चांगले काम हाेत राहील ताेवर ते पाहिले जाईल. तूर्त तरी हा काळ चांगला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...