आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लवकरच येणार 'सुपर 30'चा सिक्वेल, पहिला भाग ठरला आहे यशस्वी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमित कर्ण 
 

मुंबई : हृतिक रोशन अभिनीत 'सुपर 30' चित्रपटाच्या यशानंतर निर्माते आनंदी आहेत. आता याच्या सिक्वेलची तयारी सुरू झाली असल्याची चर्चा आहे. याचे मूळ निर्माते रिलायंसच्या व्यतिरिक्त इतर निर्मातेदेखील लेखक संजीव दत्ता यांना सिक्वेलसाठी लिहिण्यासाठी सांगत आहेत. संजीव यांच्या संवादाची इंडर्स्टीत बरीच चर्चा आहे. त्यांच्यापासून सर्वांनाच अपेक्षा आहेत. रिलायन्सदेखील या गोष्टीवर नजर ठेऊन आहेत. पार्ट टू साठी लेखक संजीव दत्ता त्यांना हवा आहे नाही जमले तर ते आनंद कुमार यांच्याकडे परत जाणार आहेत. दुसरीकडे निर्माते मधु मंटेना यांचे म्हणणे आहे की, चित्रपटाने जर चीनमध्ये चंागला व्यवसाय केला तर याचा सिक्वेल बनवण्यात येईल.

चीनच्या आवृत्तीत होणार बदल
 
हा चित्रपट लवकरच चीनमध्ये रिलीज होणार आहे. निर्माते यासाठी तयारी करत असल्याचे ऐकिवात आहे. प्रोडक्शन हाऊसशी संबंधित लोकांच्या मते, 'जुगराफिया' हे प्रेमगीत चीनमध्ये प्रदर्शित होणाऱ्या आवृत्तीमधून काढले जाईल. त्याव्यतिरिक्त यातील होळीचे गीतही कापण्यात येणार आहे. आनंद खऱ्या आयुष्यात विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे प्रेरणा देतात, तोच भाग वाढवण्यात येणार आहे. कारण चीनमध्येही शिक्षणाला खूप महत्त्व दिले गेले आहे.

रोशन कुटुंबाने व्यक्त केला आनंद


या चित्रपटाच्या कंटेंटने रोशन कुटुंब बरेच आनंदी झाले आहे. त्यांनी िरलीजच्या काही दिवसानंतर वेळ काढून आनंद कुमारसोबत लंच करून आपला आनंद व्यक्त केला. आनंद यासाठी स्वत: दुबईवरुन दिल्लीला येत होते मात्र रोशन कुटुंबाने त्यांना मुंबईला बोलावून घेतले. त्यांच्यासोबत लंच करून आम्ही खूपच खुश झाल्याचे त्यांना सांगितले.

रोशन कुटुंबाचे प्रेम पाहून भारावलो...

पार्टीच्या दिवशी रोशन कुटुंबाचा आनंद पाहण्यासारखा होता. 'सुपर 30' च्या यशाचा फायदा 'वॉर'लाही झाला, हे सर्वांनी मान्य केले. कुटुंबातील सुरक्षा आणि आदरातिथ्यदेखील मनाला स्पर्शून गेले. चीनमधील आवृत्ती बदल करण्याविषयी मला काही माहिती नाही, पण हृतिक तिथे प्रमोशन दरम्यान वेगवेगळ्या शहरांनाही भेट देणार आहे हे निश्चित आहे. त्याच्यासोबत निर्मातेही असतील. काही शहरांमध्ये मी या चित्रपटाचा प्रचार करणार आहे. चित्रपटाची जाहिरात चीनमध्ये किमान दहा शहरांमध्ये केली जाणार आहे. - आनंद कुमार