आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Seven Wonders Together Will Now See In Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता याठिकाणी एकाचवेळी पाहता येणार जगातील 7 आश्चर्य, निर्मीतीसाठी आला इतका खर्च

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : तुम्हाला जर जगातील सात आश्चर्य पाहण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली आहे. आयफिल टॉवर असो पीसाचे मिनार आता यांना पाहण्यासाठी तुम्हाला परदेशात जाण्याची गरज नाही. कारण जानेवारीपासून दिल्लीतच हे सात आश्चर्य पाहण्याचा तुम्ही आनंद घेऊ शकणार आहात . 
 
येथे उभारण्यात आले 7 आश्चर्य

दिल्लीतील राजीव गांधी स्मृतीवरमध्ये 7 वंडर पार्क तयार करण्यात आले आहे. येथे सातही आश्चर्यांचे प्रतीरूप तयार झालेले आहेत. हे पार्क उभारण्यासाठी साउइ एमसीडीने तब्बल 4.7 कोटी खर्च केले आहेत. 

 


10 एकरात विकसित करण्यात आहे पार्क
'वंडर्स ऑफ द वर्ल्ड' नावाचे हे पार्क एकूण 10 एकरामध्ये विकसित करण्यात आले आहे. यामधील 5 एकरामध्ये 7 आश्चर्यांची प्रतिकृती लावण्यात आली आहे. हे सातही आश्चर्य तयार करण्यासाठी 110 टक मेटल स्क्रॅप वापरण्यात आले आहे. एमसीडीने वेगवेगळ्या स्टोरमधून हे आणले आहे. 

 

या ठिकाणी सात आश्चर्यांसोबतच  लोकांना मॉर्निंग वॉकसाठी एक वॉकिंग ट्रॅक मिळणार आहे. मुलांसाठी झोपाळे देखील बांधले आहेत. तसेच मुलांना खेळण्यासाठी याठिकाणी प्रथमच रबराचे प्लेईंग झोन तयार करण्यात आले आहे. जेणेकरून मुलांना पडल्यानंतर इजा होणार नाही. 
 
इतकी आहे या आश्चर्यांची उंची  

याठिकाणी उभारण्यात आलेल्या आयफेल टॉवरची 60 फूट उंची आहे. तर पीसा मिनार 25 फूट उंच आहे. गीजाचा पिरॅमिड 18 फूट उंच असून कोलोसियम 15 फूट उंच आहे. याशिवाय क्रायस्ट द रिडीमरची उंची 25 फूट आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 30 फूट उंचीचा असून ताजमहल 20 फूट उंच आहे.